शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बस कंपनी ते पीएमपीएमएल

By admin | Published: February 28, 2015 11:36 PM

गेल्या ६५ वर्षांत पुणेकरांची जीवनवाहिनी बनलेली पीएमपी तेव्हाची पीएमटी. तिच्या जन्माची कहाणी अतिशय रंजक आहे.

पुणे : गेल्या ६५ वर्षांत पुणेकरांची जीवनवाहिनी बनलेली पीएमपी तेव्हाची पीएमटी. तिच्या जन्माची कहाणी अतिशय रंजक आहे. एका खासगी बस कंपनीच्या माध्यमातून तत्कालीन नगरपालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टांगेवाल्यांनी पुकारलेला संप, नगरपालिकेने निविदा काढून नेमलेल्या संस्थेचे काम काढून घेऊन तत्कालीन राज्याने स्वत: नेमलेली संस्था, त्यानंतर दुसऱ्या महायुद्धावेळी निर्माण झालेल्या अडचणींमुळे नगरपालिकेनेच ही सेवा ताब्यात घेऊन सुरू केलेली ट्रान्स्पोर्ट कंपनी असे अनेक अडथळे पार करीत तब्बल ६५ वर्षांच्या प्रवासाचा हा मैलाचा टप्पा गाठत पीएमपीएमएल आज ६६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने या बस वाहतूकसेवेचा जन्म कसा झाला, हा ‘लोकमत’च्या वाचकांसाठी घेतलेला आढावा...पीएमपीची निर्मितीपुणे व पिंपरी-चिंचवड शहरांचा विकास झपाट्याने होत गेला. लोकसंख्या वाढली. त्यांच्या गरजाही वाढल्या. पीएमटी व पीसीएमटीनेही आपल्या सेवेत खूप सुधारणा करून प्रवाशांना चांगली सेवा देऊ केली. दोन्ही संस्थांचा व्याप वाढला. त्यामुळे दोन्ही महापालिकांनी प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी, यासाठी पीएमटी व पीसीएमटीला एकत्र करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला. त्यानुसार २००७ मध्ये राज्य सरकारने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) या कंपनीची स्थापना केली. पीएमटी व पीसीएमटी या दोन्ही संस्था आता एकत्र झाल्या. एकाच प्रशासकीय यंत्रणेमार्फत बससेवेवर नियंत्रण ठेवले जात आहे. दोन्ही पालिकांना संचलन तुटीतील अनुक्रमे ६० व ४० टक्के रक्कम देण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. दोन्ही संस्था एकत्र आल्यास प्रगती होऊन प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल, असा उद्देश होता. तशी सुरूवातही चांगली झाली. या वेळी पीएमपीने भाडेतत्त्वावरील बस घेण्यासही सुरूवात केली. पीएमपीच्या ताफ्यात ६७३ भाडेतत्त्वावरील बस आहेत. मात्र, मागील दोन-तीन वर्षांत पीएमपीचा वाढलेला खर्च व मिळणारे उत्पन्न यात तफावत येऊ लागली. त्यामुळे मोठा तोटा सहन करून बस मार्गावर उतरविल्या जात होत्या. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालकपदी सक्षम अधिकाऱ्याची मागणी जोर धरू लागली. राज्य सरकारने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात डॉ. श्रीकर परदेशींच्याकडे पीएमपीचा अतिरिक्त भार दिला. त्यानंतर पीएमपी कात टाकू लागली. पीएमपीची स्थिती सुधारत आहे.अशी होती १९५० ची स्थिती ४बसची संख्या : ५७ ४प्रत्यक्षात मार्गावर असलेल्या बसची संख्या : ४५४एकूण मार्ग : १४ ४कायम भागभांडवल : १५ लाख रूपये४दरदिवशीचे सरासरी उत्पन्न : ५ हजार ३६६ रूपये४दरदिवशीचे प्रवासी अंतर : ५१५० मैल ४पहिल्या वर्षीचे एकूण अंतर : १८ लाख ८० हजार मैल४पहिल्या वर्षी मिळालेले उत्पन्न : १९ लाख ५८ हजार ९२३४बस थांबे : २५४पहिल्या वर्षी झालेले अपघात : १५३ ४पहिल्या वर्षी झालेले अपघाती मृत्यू : २४पहिल्या वर्षी झालेले गंभीर अपघात : ७ पीएमपी २०१५ ची...४बसची संख्या : २१०३४प्रत्यक्षात मार्गावर असलेल्या बसची संख्या : सुमारे १५५०४एकूण मार्ग : ३७६४दरदिवसाचे सरासरी उत्पन्न : सुमारे १.५ कोटी४दरदिवसाचे प्रवासी अंतर : सुमारे ३ लाख किलोमीटर४बस थांबे : सुमारे ३ हजार४बस आगार : १०४कर्मचाऱ्यांची संख्या : सुमारे १० हजार१८९७ मध्ये तत्कालीन पुण्यात थैमान घातलेल्या प्लेगच्या साथीचे सावट १९१२ पर्यंत कायम होते. त्यानंतर, शहराची वाढ जेमतेमच होती. या कालखंडानंतर झालेल्या पहिल्या महायुद्धाच्या सुरूवातीला शहराची वाढ पुन्हा झपाट्याने होऊ लागल्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारने पुण्यात १९१६-१७ मध्ये नगर नियोजन कायदा लागू केला. पुढे २० वर्षे या कायद्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात झाल्याने शहराचा विस्तार वाढू लागला. या कायद्यामुळे मध्यवस्तीपर्यंत मर्यादित असलेले शहर पर्वती, डेक्कन, जिमखाना, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता या परिसरात वाढू लागले. तसेच विद्येचे माहेरघर म्हणून नावारूपास आल्याने राज्यभरातील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी येऊ लागली. या वेळी एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी दळणवळणाचे साधन म्हणून टांगे, छकडे तसेच खासगी मोटारी होत्या. त्यामुळे दळणवळणासाठी बससेवेची मागणी जोर धरू लागली. त्या काळी फक्त औद्योगिक विकसित असलेल्या मुंबई, अहमदाबाद , हैदराबाद अशा प्रमुख ठिकाणीच बसची सुविधा होती. या धर्तीवर पुण्यातही ही सुविधा सुरू करण्याची मागणी पुढे आली. तत्कालीन सरकारचा नकारबससेवेची मागणी जोर धरू लागल्यानंतर नगरपालिकेने त्याबाबत सरकारकडे मागणी केली. परंतु, शहरातील रस्ते अरूंद आहेत आणि शहरात सर्वत्र मोटार स्टँड आहेत. या मोटारी शहरभर फिरत असल्याने त्यांचा मुक्त संचार बंद झाल्याशिवाय ती सुरू करता येणार नसल्याचे सरकारकडून कळविण्यात आले. त्यानंतर मोटार स्टँडची अडचण नगरपालिकेने दूर केली. दरम्यान, १९३८ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ३२ सभासद निवडून आल्याने त्यांची एकहाती सत्ता आली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर त्यांनी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतची चर्चा २० एप्रिल १९३९ च्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. टांगेवाल्यांनी पुकारले आंदोलन नगरपालिकेने बससेवेसाठी प्रयत्न सुरू करताच तत्कालीन शहरातील प्रमुख दळणवळणाचे साधन असलेल्या टांगेवाल्यांनी बंदचे अस्त्र उपसले. या निर्णयामुळे शहरातील एक हजार लोक बेरोजगार होण्याचा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी बससेवेस विरोध केला. तसेच १७ मे १९३९ रोजी शहरातील ५०० टांगेवाल्यांनी विश्रामबागवाडा येथील सभागृहापर्यंत ऐन लग्नसराईत टांगा मोर्चा काढला. त्यानंतर पुढे ३० आॅगस्ट १९३९ पासून बेमुदत संपही पुकारला. पुढे दोन दिवस हा संप टिकला.आणखी ११०० बसची गरजपुणे व पिंपरी चिंचवड शहराची वाढलेली लोकसंख्या पाहता पीएमपीला आणखी ११०० बसेसची आवश्यकता भासणार आहे. जेएनएनयुआरएमअंतर्गत ५०० बस मिळणार आहेत. उर्वरित बसेसचे नियोजन करावे लागेल. मात्र सध्या पीएमपीला बसेस लावण्यासाठी जागा नाही. त्यामुळे काही बसेसचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी दोन्ही महापालिकांना ११७ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोन्ही पालिकांनी तुटीच्या रकमा दरमहा दिल्यास पीएमपीला त्याचा मोठा फायदा होईल. पीएमपीची स्थिती सुधारत असून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. - डॉ. श्रीकर परदेशी, प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकअखेर बस वाहतुकीचा ठराव मान्यटांगेवाल्यांच्या संघटनेने केलेल्या काही मागण्या तत्कालीन नगरपालिकेने मान्य केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. दरम्यानच्या काळात नगरपालिकेने नागरिक, शिक्षण संस्था, महाविद्यालये, तसेच विविध कार्यालयांना पत्र पाठवून मते जाणून घेतली. त्यातील तब्बल ९८ टक्के संस्थांनी बससेवा सुरू करण्यास संमती दर्शविली. त्यानंतर लगेच नगरपालिकेने निविदा काढली. त्यात दोन कंपन्या पुढे आल्या. त्यात इंडस्ट्रियल सर्व्हिस लिमिटेड आणि सिल्व्हर ज्युबिली यांनी भाग घेतला. यातील सिल्व्हर ज्युबिलीने बसवरील जकात माफ करावी आणि एकाच वेळी २७ बस सुरू करता येणार नसल्याच्या अटी घातल्या; तर दुसऱ्या कंपनीने एकही अट घातली नाही. त्यामुळे बससेवेचे काम इंडस्ट्रियल सर्व्हिस कंपनीस देण्यात आले. राज्य सरकारनेच सुरू केली बससेवा १९ जून १९४० मध्ये राज्य सरकारने नगरपालिकेस पत्र पाठवून शहरातील वाहतुकीस परवानगी देण्याचा प्रश्न नगरपालिकेच्या कक्षेत येत नसल्याचे कळविले. त्यानंतर आपल्या अधिकार कक्षेत सिल्व्हर ज्युबिली कंपनीस बससेवा सुरू करण्यास संमती दिली. त्यानंतर २ एप्रिल १९४१ पासून शहरात बस वाहतूक सुरू झाली. त्या वेळी एका मैलास एक आणा आणि पुढील मैलास अर्धा आणा तिकीट होते. त्या बस लहान असल्याने त्यात केवळ १४ प्रवासी बसू शकत असत, तर १९४४ मध्ये २२ प्रवासी बसू शकतील, अशा बस रस्त्यांवर धावत होत्या. सुरूवातीला स्वारगेट ते शिवाजीनगर, स्टेशन ते लकडीपूल, स्टेशन ते स्वारगेट (जंगली महाराज रस्तामार्गे) आणि लकडीपूल ते मेनस्ट्रीट या मार्गावर धावत होत्या. पुढे आणखी सात मार्ग सुरू करण्यात आले....आणि झाला पीएमटीचा जन्मसिल्व्हर ज्युबिली कंपनीने १९४८-४९ पर्यंत शहरात बससेवा चालविली. कंपनीस दरवर्षी केवळ एका वर्षासाठीच परवानगी देण्यात येत होती. पुढे या कामात कंपनीला अनेक अडथळे येऊ लागले. युद्धजन्य स्थितीमुळे बाजारात पेट्रोल दुर्मिळ झाले. तसेच दुरूस्ती लागणारे टायर्स, ट्यूब, आॅईल तसेच इतर सुटे भाग मिळणे कंपनीस अवघड बनले. त्यामुळे ही सेवा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. तर यात भर म्हणून या कंपनीच्या कामगारांच्या दोन संघटना निर्माण होऊन त्यांनी मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग धरला. त्यामुळे कंपनीने २८ फेब्रुवारी १९५० ला कंपनीची मुदत संपत असून, पुढे ही जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे कळविले. त्यानुसार, कंपनीचा निर्णय निश्चित झाल्यानंतर त्या वर्षीच स्थापन झालेल्या पुणे महापालिकेने ही सेवा आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, १५ लाख रूपयांचे १० वर्षांच्या मुदतीचे कर्ज उभारण्यात आले आणि १ मार्च १९५० पासून ही सेवा पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ अर्थात पीएमटी म्हणून उदयास आली.