शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

बसमध्ये नाही अग्निशमन यंत्र, आगीच्या घटना घडूनही अजूनही जाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 3:14 AM

प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत.

पुणे  - प्रत्येक दीड महिन्याला सरासरी एक बस आगीत जळून खाक होत असली तरी अद्याप पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) जागे झालेले नाही. अजूनही शेकडो बसेसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविली गेली नाहीत. तसेच बसेसला आगी लागण्याची ठोस कारणेही प्रशासनाला शोधता आलेली नाहीत. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासन बसला आग लागून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल प्रवासी व चालक-वाहकांनी उपस्थित केला आहे.मागील आठवड्यात संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर अचानक बसने पेट घेतला. या आगीमध्ये बस जळून खाक झाल्यानंतर पुन्हा बस पेटण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दोन महिन्यांपूर्वीच कोथरूड बस आगारासमोर रस्त्यावरच बसने अचानक पेट घेतला होता. मागील अडीच वर्षांत १७ बस पेटल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही. या घटना घडल्यानंतर पीएमपी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी सर्व बसमध्ये अग्निशमन यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला. पण अद्यापही शेकडो बसमध्ये ही यंत्रे अस्तित्वात नाहीत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने बसची पाहणी केली. या पाहणीमध्ये अग्निशमन यंत्रांसह प्रवाशांची गैरसोय होणाऱ्या इतर बाबींचीही पाहणी करण्यात आली.प्रशासनाची यंत्रे बसविण्याची सूचना : ‘पीएमपी’तील अधिकारी अनभिज्ञ‘पीएमपी’च्या मालकीच्या नेमक्या किती बसमध्ये अग्निशमन यंत्रे आहेत, याबाबत अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, मालकीच्या सर्व सीएनजी बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली आहेत.डिझेल बसमध्ये ही यंत्रे नाहीत, तर बहुतेक सर्व बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. भाडेतत्त्वावरील बसमध्ये ही यंत्रे बसविण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. पण आतापर्यंत किती बसमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही.‘लोकमत टीम’ने एकूण १५ बसची पाहणी केली. यापैकी केवळ दोननवीन मिडी बसमध्ये अग्निशमन यंत्र आढळून आले.अन्य बसमध्ये हे यंत्र अस्तित्वात नव्हते. त्यामध्ये पीएमपीच्या मालकीसह भाडेतत्त्वावरील बसचाही समावेश आहे.याबाबत एका चालकाने सांगितले, की बसमध्ये यंत्र बसविण्यात आले होते. पण त्याचा आतापर्यंत कधीच वापर झाला नाही.त्यामुळे ते एकदा काढल्यानंतर परत बसविले नाही. काही वेळा देखभाल-दुरुस्तीवेळी आगारामध्येच हे यंत्र काढून ठेवले जाते.‘सीआयआरटी’ करणार तपासणीबसला सातत्याने लागत असलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) या संस्थेला बसेसची तपासणी करण्याची विनंती केली आहे.संस्थेकडून पुढील काही दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर विविध कंपन्यांच्या मॉडेलनुसार प्रत्येकी एका बसचे आॅडिट केले जाणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात विविध कंपन्यांच्या मॉडेलच्या बस आहेत. या प्रत्येक मॉडेलची एक बस तपासली जाणार आहे. त्यानुसार सीआयआरटीकडून अहवाल दिला जाईल.त्यामध्ये आग लागण्याची कारणे व त्यावर उपाययोजना सुचविल्या जातील. त्यानुसार बसमध्ये आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती ‘पीएमपी’चे मुख्य अभियंता-१ सुनील बुरसे यांनी दिली.मागील आठ वर्षांपासून बसने प्रवास करत आहे. पण क्वचित एखाद्या बसमध्ये अग्निशमन यंत्र दिसते. स्वयंचलित दरवाजे असलेल्या बसला आग लागल्यास यंत्रणेत बिघाड होऊन दरवाजे बंदच राहू शकतात. अशावेळी हे यंत्र बसमध्ये असणे आवश्यक आहे. इतर बसमध्येही ही यंत्रे गरजेची आहेतच.- विजय रणसुरे, प्रवासीपीएमपीकडून प्रवाशांची सुरक्षा वाºयावर सोडली जात आहे. सातत्याने आगीच्या घटना घडूनही दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे खिळखिळ््या बसने प्रवास करताना भीती वाटते. प्रशासन आगीमध्ये प्रवासी होरपळण्याची वाट पाहत आहे का?- शार्दुली कदम, प्रवासीचालकांना प्रशिक्षण पीएमपीकडून बहुतेक चालकांना अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पण बसमध्ये यंत्रच उपलब्ध नसल्याने या प्रशिक्षणाचा उपयोगच होत नाही. संचेती पुलावर पेटलेल्या बसमध्ये हे यंत्र अस्तित्वात नसल्याने चालकाला त्याचा वापर करता आला नाही.

टॅग्स :Puneपुणे