पुणे: पीएमपीएल च्या बसला आग लागण्याचे सत्र काही केल्या थांबण्यास तयार नाही. बुधवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी निगडी- कात्रज बायपास ही बस वारजे पूलाजवळ (रोझरी शाळा) येथे आली असता बोनेटमधुन अचानक धुर निघायला सुरुवात झाली. चालक रमेश उगले यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी बसचे हँड ब्रेक दाबून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यानंतर काही मिनिटांत च बसने पेट घेतला. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदॅवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीच्या बसमधून प्रवाशी उतरल्यानंतर काही सेंकदातच बसने पेट घेतला. तात्काळ या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. सिंहगड रस्ता व कोथरुड येथून अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी काही मिनिटांमध्ये ही बसला लागलेली आग विझविली . मात्र, तोपर्यंत बस पूर्ण्रपणे जळून खाक झाली होती.
वारजे येथे पीएमपीची बस आगीत जळून पूर्णपणे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:44 PM