पुणे: अष्टविनायकाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांसाठी शिवाजीनगर आगारातून दि. २९ जानेवारी रोजी अष्टविनायक दर्शन साधी बस सेवा चालू करण्यात येत आहे. सदरची बस शिवाजीनगर आगार वाकडेवाडी येथून सकाळी ७ वा. सुटून ओझर येथील भक्तीनिवास येथे मुक्कामासाठी थांबेल. दुसर्या दिवसी रात्री १० पर्यंत शिवाजीनगर येथे परत येईल.
दर्शनासाठी जाणार्या प्रत्येक प्रवाशाला ९९० रुपये तिकीटाचे भाडे असून, जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे. सदर सेवा ही आरक्षण प्रणालीसाठी ATHVNK सांकेतिक कोड नुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर व इतर संकेतस्थळावरून देखील आरक्षण करता येईल. सदर सेवा ही अल्प दरात असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे यांनी केले आहे.