शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मराठमोळ्या उद्योजकाची 'अभिमानास्पद' कामगिरी'; पुण्याचे आनंद देशपांडे ‘टेक बिलेनियर’चे पहिले मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 9:09 PM

गेल्या दोन दिवसांत ‘पर्सिस्टंट’च्या समभाग मूल्यात (शेअर व्हॅॅल्यूत) झालेल्या वाढीमुळे देशपांडे अब्जाधीश बनले आहेत.

सुकृत करंदीकर - पुणे : पर्सिस्टंट या डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘पर्सिस्टंट’चे संस्थापक आनंद देशपांडे हे पुण्याचे पहिले ‘टेक बिलेनियर’ बनले आहेत. गेल्या दोन दिवसांत ‘पर्सिस्टंट’च्या समभाग मूल्यात (शेअर व्हॅॅल्यूत) झालेल्या वाढीमुळे देशपांडे अब्जाधीश बनले आहेत.

आनंद देशपांडे यांच्याकडे ‘पर्सिस्टंट’चे तीस टक्के शेअर्स आहेत. त्यांची आजची किंमत १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे साडेसात हजार कोटी रुपये आहे. पूनावाला, कल्याणी, बजाज यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके अब्जाधीश पुण्यात असले तरी हे सर्व उद्योगपती प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रातले आहेत. टेक्नॉलॉजीमधले पहिले अब्जाधीश पुणेकर देशपांडे ठरले आहेत.

देशपांडे यांनी सन १९९० मध्ये त्यांच्याकडची शिल्लक आणि वडील व मित्रांकडून घेतलेले कर्ज यातून २१ हजार डॉलर्स उभे केले आणि पर्सिस्टंट सिस्टिम ही टेक कंपनी पुण्यात सुरू केली. आज ही कंपनी ५६६ दशलक्ष डॉलर्सची आहे. मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने उत्पन्नात १३ टक्के वाढ केली. कंपनीचा निव्वळ नफा ३८ टक्क्यांनी वाढून ६२ दशलक्ष डॉलर्सवर गेला. पर्सिस्टंटच्या एकूण व्यवसायातील ८० टक्के वार्षिक महसूल अमेरिकेतून येतो. उर्वरीत वीस टक्के युरोपीय देश आणि भारतातून येतो. पर्सिस्टंटमध्ये आज ४५ देशांमधले १४ हजार तंत्रज्ञ काम करतात. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांच्याप्रमाणेच जागतिक प्रतिष्ठा मिळवणारी ही ‘लिस्टेड कंपनी’ आहे.

पर्सिस्टंटच्या शेअरमध्ये यंदा १४९ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच देशपांडे पुण्यातले पहिले ‘टेक बिलेनियर’ बनले आहेत. दरम्यान, २०१९ मध्ये देशपांडे यांनी कंपनीचे सीईओपद सोडले. ते आता अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळतात. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. देशपांडे मूळचे मध्य प्रदेशातील भोपाळ येथील असून त्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. खरगपूर आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये अमेरिकेतून पीएचडी मिळवली. सन नव्वदमध्ये भारतात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ही संकल्पना सुरू झाल्यानंतर देशपांडे अमेरिकेतून भारतात परतले. ‘पर्सिस्टंट’व्यतिरिक्त स्वत:च्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते तरुणांना मार्गदर्शन करतात. पंचवीस हजार उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले असून उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना ते मार्गदर्शन करतात. 

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसाय