शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 1:58 AM

सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

जुन्नर - सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यातच जुन्नर येथील उद्योजक गुरुनाथ चव्हाण यांनी ऐनवेळी प्रसंगावधान दाखविल्याने ते बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले.बिबट्याच्या हल्ल्यापासून पळ काढताना भीतीने तोंडातून मदतीसाठी आवाजदेखील बाहेर पडत नव्हता. अशा वेळी शेताच्या परिसरात असलेल्या सात-आठ भटक्या कुत्र्यांना बिबट्याची चाहूल लागल्याने त्यांनी एकत्रितपणे बिबट्यावर आक्रमकपणे भुंकणे सुरू केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर चव्हाण यांनी जखमी अवस्थेत एका हाताने गाडी चालवीत जुन्नर येथे येऊन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. बिबट्या आपल्यावर आता हल्ला करणार, हे ध्यानात आल्यावर शिताफीने हल्ला चुकविण्यासाठी पळ काढला. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया गुरुनाथ चव्हाण यांनी व्यक्त केली. या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर आहे. शेतकरीवर्गाला भीतीपोटी रात्रीचे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी चिंतीत आहे. कारण पशुधनावर हल्ले वाढले आहेत.डाव्या हाताला मार, मनगट मोडले...गुरुनाथ चव्हाण हे वडज येथील कुलस्वामी खंडेरायाचे मुख्य ठाणे असलेल्या वनविभागाच्या डोंगरालगत असलेल्या त्यांच्या फार्महाऊसवर संध्याकाळी गेले असताना फार्महाऊसच्या सीमाभिंतीचे गेट उघडत असताना अवघ्या २० फूट अंतरावर असलेला बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करणार, हे त्यांच्या निदर्शनास आले.तीन फुटांवरच असलेल्या गाडीचा दरवाजा उघडून त्यात बचावासाठी आसरा घ्यावा, असे चव्हाण यांना वाटले. परंतु भीतीने थरकाप झाल्याने खिशातून गाडीची चावी काढण्यातही त्यांना अपयश आले. परिणामी त्यांनी गेटसमोरून पळ काढला. अंधारात पळत असताना रस्त्यावरील खाचखळग्यात अडखळून ते खाली पडले. यावेळी त्यांचा डावा हात, मनगट मोडले. पायाला तसेच अंगावरही जखमा झाल्या.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या