पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, विनोदी साहित्य लेखनासाठी कॉन्टिनेन्टल पुरस्कृत कै. चिं. वि. जोशी पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी या वर्षी दीपा मंडलिक मुंबई यांच्या 'दिवस असे की' या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सायन पब्लिकेशन, पुणे या संस्थेलाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिक शकुंतला फडणीस आणि डॉ. सुवर्णा दिवेकर यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड केली. हा पुरस्कार समारंभ शुक्रवार दि. १९ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
दीपा मंडलिक यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. चिं. वि. जोशी साहित्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:45 AM
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, विनोदी साहित्य लेखनासाठी कॉन्टिनेन्टल पुरस्कृत कै. चिं. वि. जोशी पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी या वर्षी दीपा मंडलिक मुंबई यांच्या 'दिवस असे की' या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देया वर्षी दीपा मंडलिक मुंबई यांच्या 'दिवस असे की' या पुस्तकाची करण्यात आली निवडया पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सायन पब्लिकेशन, पुणे या संस्थेलाही दिला जाणार पुरस्कार