शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

काळ्या यादीत टाकल्याने कॅब चालकांचा साेमवारी संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 8:08 PM

कॅब चालकांची अार्थिक परवड हाेत अाहे. त्यातच कंपनीकडून काळ्या यादीत टाकण्यात येत अाहे. त्यामुळे कॅबचालकांनी साेमवारी संप पुकारला अाहे.

ठळक मुद्देकाळ्या यादीत टाकल्याने केला अाेला, उबेर चालकांचा संपवीस हजारांहून अधिक कॅब चालक बंदात हाेणार सहभागी

पुणे : वाढत्या स्पर्धेमुळे कॅब चालकांचीही आता आर्थिक परवड होऊ लागली आहे. कर्जाने घेतलेल्या वाहनांची कर्जे फेडण्यापुरते पैसेही मिळत नसल्याचा दावा चालक करत आहेत. त्यातच प्रवासी वाहतुक करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून काळ्या यादीत टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील ओला, उबेर चालक उद्या (दि. १९) संपावर जाणार आहेत. पुणे शहरातील सुमारे २० हजारांहून अधिक कॅबचालक या संपात सहभागी होणार आहेत.    मागील काही वर्षांपासून ओला, उबेर या प्रवासी वाहतुक करणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबई, ठाणे व अन्य काही शहरांमध्ये रिक्षा, टॅक्साचालकांशी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे पुर्वी होणारा व्यवसाय व सद्यस्थितीतील व्यवसायात फरक पडला आहे. आता कंपन्यांच्या जोडल्या गेलेल्या कॅबचालकांना हा व्यवसाय परवडेना झाला असल्याचा दावा चालक करत आहेत. यापार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेने राज्यात सोमवारी कॅबचालकांचा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासून कॅबचालक संप करून कंपन्यांचा निषेध करणार आहेत.     वाहतुक सेनेचे शहराध्यक्ष गणेश नाईकवडी म्हणाले, सुरूवातीच्या काळात ओला, उबेर या कंपन्यांनी अनेकांना गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यावेळी चालकांना पैसेही चांगले मिळत होते. त्यामुळे अनेकांनी कर्ज काढून २ ते ३ गाड्या घेतल्या. मात्र, आता या वाहनांचे प्रमाण वाढल्याप्रमाणे रोजचा व्यवसाय घटला आहे. त्यातच कंपन्यांची मक्तेदारी वाढली आहे. छोटी कारणे सांगून चालकांना काळ्या यादीत टाकले जात आहे. व्यवसाय वाढल्याने कंपन्यांनी स्वत:च गाड्या घेतल्या आहेत. त्यांनी अनेक आयटी कंपन्या तसेच अन्य कंपन्यांशी करार करून आपलीच वाहने लावली आहेत. त्यामुळे कॅबचालकांचा व्यवसाय कमी होण्याबरोबरच कंपनीकडून गाड्या बंद केल्या जात असल्याने कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व कॅबचालक संप करणार आहेत.       ओला, उबेरने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला १.२५ लाख रुपये व्यवसायाची हमी द्यावी, कारच्या श्रेणीनुसार भाडे देण्यात यावे, कमी दराची बुकींग बंद करावी, ओला, उबेरने स्वत:कडील गाड्या बंद कराव्यात, काळ्या यादीत टाकलेल्या गाड्या व वाहन चालकांचा व्यवसाय पुन्हा सुरू करावा अादी मागन्या चालकांनी केल्या अाहेत. 

टॅग्स :StrikeसंपOlaओलाUberउबरPuneपुणे