लोकमत न्यूज नेटवर्क
पुणेः - अभय कोटकर (ए. के.) क्लब आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या दोन दिवसीय निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत २२ यार्ड संघ आणि केडन्स अकादमीने प्रतिस्पर्ध्यां विरुद्धच्या अनिर्णित सामन्यात पहिल्या डावाच्या अधिक्यावर विजय मिळविले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात वेदांत सणस, हृषीकेश दौड, देवेंद्र जैन यांच्या बळावर २२ यार्ड संघाने डेक्कन जिमखाना क्लबचा पहिल्या डावाच्या आधिक्यावर पराभव केला. डेक्कन जिमखाना क्लबचा पहिला डाव १२६ धावांत संपला. त्यानंतर प्रत्युत्तरात २२ यार्ड संघाने २०७ धावा करत पहिल्या डावात ८१ धावांची आघाडी मिळवली. दुसरा डाव डेक्कन जिमखाना क्लबने सात बाद २७६ धावांवर घोषित केल्यानंतर २२ यार्ड संघाने उर्वरित वेळात दुसऱ्या डावात सहा बाद ९८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक ः
डेक्कन जिमखाना क्लब - पहिला डाव - (३४.१ षटकांत) सर्वबाद १२६ (साहिल नालंगे ३२, रितेश राजक २७, देवेंद्र जैन ३-१८, रोहित ढमाले २-३०, आरूष पिव्हाळ २-३८, वेदांत सणस १-११, जय गायकवाड १-२०) व दुसरा डाव - (५६.३ षटकांत) ७ बाद २७६ घोषित (साहिल नलंगे ५४, क्रिश शहापूरकर ४९, देवराज बेदारे ४१, कंश दीक्षित ४०, यश घारे ३२, ओम पाटील २-४१, आरूष पिव्हाळ २-४३, रोहित ढमाले १-२०, रतन उत्तुरे १-२०, देवेंद्र जैन १-४५) अनिणीत विरुद्ध २२ यार्ड संघ - पहिला डाव - (६२.३ षटकांत) सर्वबाद २०७ (वेदांत सणस ५९, हृषीकेश दौड ३७, रतन उत्तुरे २३, हर्ष भोईटे २३, अथर्व सणस ४-४०, संस्कृत गायकवाड ४-६५, सर्वेश सुर्वे १-२६, रिद्धेश भुरूक १-२७) व दुसरा डाव - (२८ षटकांत) ६ बाद ९८ (ह्रषीकेश दौड ४५, वेदांत गोरे नाबाद २१, अथर्व सणस २-१५, सर्वेश सुर्वे २-३२, रिद्धेश भुरूक १-१३, रितेश राजक १-१८)
केडन्स अकादमी - पहिला डाव - (६४.३ षटकांत) सर्वबाद २१५ (आर्यन गोजे ७०, अनिरुद्ध साबळे ४५, ओंकार भागवत ३१, अक्रम सय्यद २६, हर्षल मिश्रा ५-४१, भूपिंदर ठाकरे २-४६, क्षितिज चव्हाण १-६, सिद्धांत भामरे १-५०) व दुसरा डाव - (२७ षटकांत) ४ बाद १६९ घोषित
(आर्शीर्न कुलकर्णी ५९, दिग्विजय पाटील ४१, अनिरुद्ध साबळे नाबाद ४०, अक्रम सय्यद नाबाद २७, प्रणव पारिख १-३१, सिद्धांत भामरे १-३४, मानस किरवे १-४०, हर्षल मिश्रा १-४५) अनिणीत विरुद्ध ब्रिलियंट क्रिकेट अकादमी - पहिला डाव - (५२ षटकांत) सर्वबाद १८७ (मनलिव घई ७७, ओम खटावकर ६३, दिग्विजय पाटील ५-२७, अक्रम सय्यद ४-४७, आर्शीन कुलकर्णी १-२७) व दुसरा डाव - (४२ षटकांत) ९ बाद १३९ (रिषी नाळे ४६, क्षितिज चव्हाण ३४, पार्थ कांबळे ५-११, ओंकार भागवत ३-४७, निलय संघवी १-१३).