पिंपरी : महापालिका निवडणूकीसाठी शहरातील सगळे पक्ष सज्ज झाले आहेत. इच्छुक उमेदवार प्रचारासाठी नवनवीन युक्त्या लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूक आणि नवीन वर्ष याचां मेळ साधत दिनदर्शिका (कॅलेंडर) या माध्यमाचा उपयोग केला जात आहे. प्रचार मोहीम अधिक प्रभावी व यशस्वी होईल यासाठी कार्यकर्ते झटत आहेत. मतदाराला वळविण्यासाठी त्याच्या दैनंदिन व्यवहारातील गोष्टींचा, आवडीनिवडीचा विचार केला जात आहे. मतदारावर आपल्याच पक्षाचा प्रभाव रहावा हा त्यामागील हेतू दिसून येतो. दर वर्षी वाट पहाव्या लागणाऱ्या दिनदर्शिका या वेळी मात्र प्रचाराच्या स्वरुपात नागरिकांच्या घरी पोहोचल्या आहेत. पंधरा ते वीस दिनदर्शिका एकाच घरात आल्याचे दिसत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनातील दिनदर्शिकेचे स्थान घेऊन विविध पक्षांतर्फे प्रचारासाठी तिचा वापर केला जात आहे. आकर्षक मांडणी करण्यात आलेल्या या दिनदर्शिकामंध्ये प्रामुख्याने पक्ष व त्याच्या कामकाजावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पहिल्या पानावर पक्षाच्या प्रेरणास्थान असणाऱ्या व्यक्तीचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. महिन्याच्या पानावर दिन, वारांसोबत इच्छुक उमेदवार व त्यांनी केलेल्या कामाची माहिती देण्यात आली आहे. प्रभागातील पूर्व व सध्याचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. आमच्या पक्षाची निवड का योग्य यावरही विचार मांडल्याचे काही दिनदर्शिकेत दिसून येत आहे. थोडक्यात, मतदाराचे उमेदारासंबंधित मत सकारात्मक बनविण्यासाठी याचा प्रभावी वापर केला जात आहे. पक्षीय दिनदर्शिकेमुळे प्रिंटीग व्यावसायिकांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.(प्रतिनिधी)मतदारांशी वाढले हितगुज निवडणूकाच्या या काळात इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांची विचारपूस करत त्याच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आपापसात शत्रु मानले जाणारेही एकमेकांसोबत पक्षाचा प्रचार करताना दिसून येत आहेत. मतदारांच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. भेटवस्तूंवर आचारसंहितेची संक्रांतपिंपरी : निवडणूकीच्या प्रचारात महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संक्रांतीतील हळदी-कुंकू कार्यक्रम हे प्रचाराचे प्रभावी माध्यम समजले जाते. यंदा मात्र संक्रांतीपूर्वीच आचारसंहिता लागू झाल्याने इच्छुकांतर्फे नियोजित हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. कार्यक्रमादरम्यान वाटप करण्यात येणाऱ्या भेटवस्तूंवरही संक्रांत आली आहे. निवडणूकीच्या या धामधुमीत नेते मंडळी आपल्या पक्षाच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. प्रचार उत्तमरीत्या व्हावा यासाठी पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. प्रचारावेळी समाजातील विविध घटकांचाही विचार करीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विविध शकला लढविल्या जात आहेत.यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मकर संक्रातीतील हळदी-कुंकू कार्यक्रमाचा वापर केल्याचे दिसत आहे. खरेतर हे प्रचारमाध्यम म्हणून पूर्वीपासून चालत आले आहे. यंदा इच्छुक उमेदवारांनी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे नियोजन केले. मोठ्या प्रमाणावर त्यांची तयार करण्यात आली. महिला वस्तूंसाठी आग्रही असतात. त्याचा या स्वभावाचा फायदा राजकीय मंडळी उचलताना दिसले. महिलांसाठी वाण म्हणून देण्यात येणाऱ्या भेटवस्तू दुसऱ्या इच्छुकांमार्फत देण्यात येणाऱ्या भेटवस्तूपेक्षा कशी सरस असेल यावर भर दिल्याचे दिसून आले. परंतु संक्रांतीपूर्वीच आचारसंहिता लागू झाल्याने पक्षांच्या नियोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात वाटप करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर, भेटवस्तूंवर मर्यादा आल्या आहेत. कार्यक्रमांच्या नियोजनावर संक्रांत आल्याचे दिसत आहे.
प्रचारासाठीच्या कॅलेंडरचा भडिमार
By admin | Published: January 13, 2017 3:07 AM