पुणे : पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पावसानंतर पाणी तुंबणे व इतर समस्यांसाठी खास नियोजन केले आहे. प्रथमच या समस्या नागरिकांना होऊ नयेत किंवा त्या समस्या निर्माण झाल्या, तर त्वरित सोडविण्यासाठी प्रत्येक वॉर्डला मदत नंबर देण्यात आला आहे. नागरिकांनी त्यावर कॉल करून समस्या सांगितल्यास ती सोडविण्यात येणार आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावर वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. परिणामी कोंडीचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो. ही समस्या यंदा होऊ नये, यासाठी पहिल्यांदाच बोर्डातर्फे आठ वॉर्डसाठी संपर्क नंबर देण्यात आले आहेत. नागरिक थेट संबंधित नंबरवर कॉल करून समस्या सांगायची आहे. दरम्यान, नागरिकांनी घराच्या परिसरात टायर, नारळाच्या फांद्या किंवा इतर साहित्य ठेवू नये, असे आवाहन केले आहे. कारण या साहित्यामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. डास मोठ्या प्रमाणावर झाल्यास नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यासाठी बोर्डातर्फे नागरिकांना असे साहित्य न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्यामुळे नागरिकांनी कुठे तक्रार करायची, अशी अडचण यापूवी असायची. पण नागरिकांनी कुठेही समस्या निर्माण झाली, तर त्वरित बोर्डाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधता यावा, यासाठी आम्ही पहिल्यांदाच कॉल सेंटरचे नंबर दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. - प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्ष, पुणे कॅँटोन्मेंट बोर्ड
समस्यांसाठी संपर्क नंबर वॉर्ड क्रमांक १ व २ : ९८२२१२३५५७वॉर्ड क्रमांक ३ : ७७९८१६१३१२वॉर्ड क्रमांक ४ : ९८२२१५१७०४वॉर्ड क्रमांक ५ : ७७९८०११५८१वॉर्ड क्रमांक ६ : ९८८११०७८५६वॉर्ड क्रमांक ७ : ९८६०४०६८५१वॉर्ड क्रमांक ८ : ९८५००२७३५८