शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

जरांगेंसह भुजबळांनाही बोलवा, सर्वपक्षीय बैठक घ्या; आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:41 PM

मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही एका मंचावर आणावं, असा पर्याय शरद पवार यांनी सुचवला आहे.

Sharad Pawar On Maratha Reservation ( Marathi News ) : "महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. दोन समाजांमध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजेत. वेळीच काळजी घेतली नाही तर वातावरण काय होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी आणि त्यांना जे योग्य लोकं वाटतील त्यांना बोलवावं. विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही हजर राहू आणि सहकार्याची भूमिका घेऊ. मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या मनोज जरांगे पाटील यांनाही सरकारने निमंत्रित करावं. तसंच ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही निमंत्रित करावं आणि या संयुक्त बैठकीतून आपण चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी," असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुणे इथं पत्रकार परिषद घेत व्यक्त केलं आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पुणे येथील मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेत त्यांना मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली. पवार यांनी या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी काय करता येऊ शकतं, याबाबत आपलं मत मांडलं आहे. मुख्यमंत्र्‍यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही एका मंचावर आणावं, असा पर्याय पवार यांनी सुचवला आहे.

आरक्षणाच्या तिढ्यातून कसा निघणार मार्ग?

मराठा आरक्षणाबाबत पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, "आरक्षणाबाबत एक अडचण येण्याची शक्यता आहे. ती म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय यापूर्वीच कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारकडे याबाबतची आग्रही भूमिका मांडली पाहिजे. फक्त तामिळनाडूतील ५० टक्क्यांवरील आरक्षण टिकलं होतं. मात्र त्यानंतर जेवढे काही निर्णय आले ते आरक्षण ५० टक्क्यांच्या आतमध्ये हवेत असेच आहेत. त्यामुळे हे धोरण बदललं गेलं पाहिजे आणि हे बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे आपल्याला केंद्र सरकारकडे जावं लागेल. राजकीय मतभेद बाजूला ठेवून केंद्र सरकार असा निर्णय घेणार असेल तर आमचं पूर्ण सहकार्य राहील. "

दरम्यान, "समाजात तेढ निर्माण न होण्याच्या दृष्टीने माझ्या वाचनात मध्यंतरी एक भूमिका आली आणि ती भूमिका मला योग्य वाटली. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडत असताना धनगर, लिंगायत, मुस्लीम अशा विविध समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न मांडला. आपआपसात सामंजस्य राहण्याच्या दृष्टीने अशी भूमिका गरजेची आहे. हेच मी आज आलेल्या आंदोलकांनाही सांगितलं आणि ते त्यांनाही पटलं," अशी माहितीही शरद पवार यांनी दिली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ