शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

हिवताप नियंत्रणासाठी मोहीम

By admin | Published: June 02, 2016 12:52 AM

राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत राज्यभरात हिवतापाच्या प्रतिबंधासाठी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जाणार आहे.

पुणे : राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत राज्यभरात हिवतापाच्या प्रतिबंधासाठी जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जून महिना हा दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा करत हिवतापाबाबत जनजागृती केली जाते. या आजाराची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि या आजाराला कारणीभूत असणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रविवार सोडून सर्व दिवस म्हणजेच एक दिवस एक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्यातील हिवतापाच्या रुग्णांची संख्या मागील वर्षीपेक्षा कमी झाली असून, येत्या काळात ही संख्या आणखीन कमी करायची असल्याचेही डॉ. जगताप यांनी सांगितले. यामध्ये दरहजारी लोकसंख्येमागे दरवर्षी किती हिवतापाचे रुग्ण आहेत, यानुसार त्या जिल्ह्याची नोंद केली जाते. या परिमाणानुसार राज्यात वार्षिक रोगजंतू निर्देशांक ०.१ पेक्षा कमी कमी असणारे १६ जिल्हे असून, त्यात पुण्याचा समावेश आहे. हा निर्देशांक १ हून कमी असणारे १५ व निर्देशांक १ ते २ असणारे गोंदिया व चंद्रपूर हे २ जिल्हे आहेत. हा रोगजंतू निर्देशांक १० पेक्षा जास्त असणारा गडचिरोली हा एकमेव जिल्हा आहे. २०२५ पर्यंत राज्यातून हिवताप हा आजार हद्दपार व्हावा, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार विशेष प्रयत्न चालू असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)