साहित्य : गोल आखण्यासाठी साहित्य, फक्की
काय साध्य होईल :
आळसाने संधी कमी मिळते हे लक्षात येईल.
सज्जतेसाठी घोषणा :
पळा रे पळा, बोटीमध्ये पळा
एका एका बोटीत, किती किती सैनिक (२/३/४/५/६)
खेळ खेळायचा कसा :
एक गोल तयार करून त्या गोलावर सहा बोटी तयार कराव्यात. नंतर जेवढे खेळाडू असतील त्या सर्वांना गोलावर उभे करून घ्यावे. सर्वांची तोंडे उजवीकडे करून घ्यावीत व गोलात पळावयास सांगावे. शिक्षक मध्ये उभे राहतील. "शिक्षक पळा पळा, बोटीमध्ये पळा" अशी घोषणा देतील. विद्यार्थी एका एका बोटीत किती किती सैनिक असे विचारतील. शिक्षक कोणताही आकडा सांगतील. शिक्षक जो अंक सांगतील तेवढी मुले एका बोटीत उभे राहतील. त्यांना बोट मिळणार नाही त्यांना गमतीशीर शिक्षा करून परत गोलात फिरण्यास सांगावे.
सूचना : "पळा पळा, चटकन लवकर पळा, चटकन पळा" ही सूचना मुलेही पाठीमागे म्हणतील. बोटीमध्ये पळा म्हटल्यानंतर "एका एका नावेत किती किती सैनिक" मुलांनी म्हणावे. अशीही सूचना देता येईल किंवा
'वादळ आलं, वारा सुटला, पाऊस आला कॅप्टनचा हुकुम एका एका बोटीवर 'जण' याप्रमाणे घेता येईल.