आंबेठाण - हिंदू संस्कृतीमध्ये अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ते आश्विन मासातील अमावास्येपर्य$ंतच्या काळातील पितृ पंधरवड्यात दिवंगत झालेल्या आप्तांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध घातले जाते. त्याकरिता काकस्पर्श महत्त्वाचा असतो; परंतु वाढते शहरीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची हानी होत आहे. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही कावळ्यांची संख्या कमी होत आहे.गरुडपुराणात म्हटले आहे, की पितृ पंधरवड्यात पितरांचे श्राद्ध घातल्याने पितर तृप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात. पितरांचे श्राद्ध हे भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते आश्विन कृष्ण अमावास्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या सुरू होत असलेला पितृ पंधरवडा हा चौदा दिवसांचाच आहे. दि. ९ आॅक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पितृ पंधरवड्यात पिंडाला (घासाला) शिवण्याकरिता कावळे आवश्यक असतात; परंतु वाढते शहरीकरण व निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पिंडदान करणाºयांना तासनतास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र, ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे झालेआहेत.हिंदू संस्कृतीमध्ये पितृ पंधरवड्यात काकस्पर्श महत्त्वाचा मानतात. मृत व्यक्तीच्या दसपिंड विधीमध्येही काकस्पर्श महत्त्वाचा मानण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीत पौराणिक सांगड घालून कावळ्याचे महत्त्व पटविण्यात आले.ग्रामीण भागात कावळे दुर्मिळ झाले आहेत. वास्तविक सप्टेंबर, आॅक्टोबरदरम्यान शेतीची कामे केली जातात. त्यामुळे पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध असते. कावळा पर्यावरणरक्षणाचे काम करतो. परिसरात पडलेले सडके मांस, मृत प्राणी, किडे, अन्य कीटक यांच्यावर कावळा आपले जीवन जगतो. त्यामुळे पर्यावरणात तो स्वच्छतादूत म्हणून महत्त्वाचा ठरतो.
पिंडाला शिवण्याकरिता कावळा सापडेना; शहरीकरणाचा असाही परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 12:37 AM