वाकी : पाटबंधारे खात्याने सन १९९४ मध्ये उजव्या कालव्याची योजना सुरू केली आणि कालवे बांधूनही तयार केले. पण आजतागायत त्या कालव्यांना पाणी आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून कालवा आहे, अशा एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही.वेळोवेळी या कालव्याला पाणी यावे, यासाठी निवेदने देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनदेखील प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे आता एक तर या कालव्याची पुनर्रचना करून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा या कालव्यामार्फत करा नाही तर तो बुजवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला द्यावा, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली.
२३ वर्षांपासून कालवा कोरडा
By admin | Published: April 26, 2017 2:48 AM