शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

‘एमआयएम’ची मान्यता रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 2:59 AM

भारतात राहायचे, आमच्याच मतांवर निवडून यायचे अन् देशविरोधी वक्तव्य करायचे, ही कोणती पद्धत? भारतात राहायचे असेल, तर देशाभिमान बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा

कोरेगाव भीमा : भारतात राहायचे, आमच्याच मतांवर निवडून यायचे अन् देशविरोधी वक्तव्य करायचे, ही कोणती पद्धत? भारतात राहायचे असेल, तर देशाभिमान बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करतानाच त्याला खासदार ओवैसी यांना देशातून हद्दपार करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांनी येथील निषेध सभेत केली. खासदार असदुद्दीन ओवैसी व आमदार वारिस पठाण यांनी ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार दिल्याने राज्यात मोठे वादळ उठले आहे. आज सकाळी शिवसेना पुणे जिल्हा व शिरूर-हवेली तालुक्याच्या वतीने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील शिवाजी चौकामध्ये निषेध सभा व ओवैसी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्याप्रसंगी गावडे बोलत होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरूर तालुकाप्रमुख पोपट शेलार, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शहरप्रमुख संजय देशमुख, उपतालुकाप्रमुख मधुकर भंडारे, रोहिदास शिवले, अमोल हरगुडे, वडगावशेरी महिला आघाडी प्रमुख अमृता पठारे, तालुका उपप्रमुख अलका सोनवणे, संगीता विकारे, मंजुळा सासवडे, स्वप्नाली टाकळकर व असंख्य शिवसैनिक व महिला उपस्थित होते. या वेळी सभेनंतर ओवैसी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गावडे म्हणाले, ‘‘भारताला १५० वर्षे स्वातंत्र्यलढ्याची परंपरा असल्याने प्रत्येक देशवासीयाच्या नसानसांत वंदे मातरम भिनत आहे. परंतु ओवैसी व एमआयएम पक्षाचे आमदार भारतात राहून देशविरोधी कारवाया करत आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध करतानाच आता ‘भारतमाता की जय’ म्हणण्यासही नकार दिल्याने त्याच्यावर शासन कारवाई करेल की नाही याची वाट शिवसेना पाहणार नाही. भारतात राहायचे असेल तर देशाभिमान बाळगणे गरजेचे असून, शासन कारवाई करत नाही ही शोकांतिका असल्याने भारत आता सहिष्णुतेकडून असहिष्णुतेकडे चालला आहे काय?’’पोपट शेलार यांनी देशात राहूनही देशाभिमान बाळगण्यास लाज वाटत असेल तर पाकिस्तानात जा, असे मत व्यक्त केले.सूत्रसंचालन साईनाथ गव्हाणे यांनी केले, संजय देशमुख यांनी आभार मानले.हार्दिक पटेलच्या आंदोलनात देशाचा ध्वज पडला. देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर नोंदविला. मात्र, ओवैसी व त्याच्या पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने देशविरोधी वक्तव्य केली जाऊनही देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जात नाही, ही शोकांतिका असून, शासनाचे दुटप्पी धोरण यातून स्पष्ट असल्याचे राम गावडे यांनी सांगितले.