यावेळी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले. या प्रसंगी बळवंत माने, बाळासाहेब देवकाते, नगरसेवक कुंदन लालबिगे बाळासाहेब जाधव,भारत देवकाते, पत्रकार सूरज देवकाते, सेवक अहिवळे , निवृत्ती गोरे ,पंडित गुळवे उपस्थित होते.
बारामती होलार समाजाच्या वतीने दर वर्षी शिखर-शिंगणापूर येथे यात्रेनिमित्त समाजाच्या वतीने कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी दर वर्षी महाप्रसाद, तसेच अन्नदानाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. मात्र, यंदा देखील देशामध्ये कोरोनाच सावड व सर्व ठिकाणी संचारबंदी, लॉकडाऊन असल्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांची दयनीय अवस्था होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील होलार समाजाच्या वतीने गोरगरीब गरजू नागरिकांना साखर वाटप करण्याचा उपक्रम समाजाच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी सदाशिव गुळवे, ईश्वर पारसे, अर्जुन चौगुले, महादेव जाधव, गोरख पारसे, नितीन अहिवळे यांनी मोठे परिश्रम घेतले.
होलार समाजाच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून बारामतीतील ५०० गोरगरीब कुटुंबांना घरोघरी जाऊन साखर वाटप केली.
२९०४२०२१-बारामती-०५