सर्वसामान्य महिलावर्गात कर्करोग जागृती व निदान होणे आवश्यक आहे याच उद्देशाने शिबिराचे आयोजन करून आयब्रेस्ट एकझाम मशीन (आयबीई) या अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांची संख्या ३४ एवढी नियंत्रित ठेवण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पुणे म.न.पा. च्या वॉर्ड क्रमांक २६ च्या नगरसेविका प्राची आल्हाट, महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर, प्रयास संस्थेच्या तृप्ती धारपवार, सेंटर फॉर एक्सलन्स फॉर मदर अँण्ड चाइल्ड केअरचे डॉ. सुशील देशमुख, डॉ. प्रणिता जोशी देशमुख, मुख्याध्यापक डी. एम. पाटील , मुख्याध्यापिका एस. ए. झरेकर, मुख्याध्यापक पी. बी.भापकर उपस्थित होते. अनुजा ओमासे यांनी सूत्रसंचालन केले.