पिंपरी : महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने दर महिन्याला कर्करोगाचे वायसीएम रुग्णालयात ५ ते ६ महिला रुग्ण संशयित आढळत आहेत. अशिक्षित महिलांमध्येच नव्हे, तर सुशिक्षित महिलांमध्येही सध्या स्तनाच्या व पिशवीच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण महिलांमध्ये चिंताजनक आहे.महिलांमध्ये असणारे वंध्यत्व किंवा उशिरा होणारी गर्भधारणा किंवा मूल जन्माला न घालण्यामुळेही आजार संभवतो. तसेच बाळाला स्तनपान न केल्यासही कर्करोगाचा धोका वाढतो. काही महिलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण अधिक असल्यासही धोका जास्त वाढतो. जीवाणूच्या संसर्गामुळेही हा रोग होतो.महिलांमध्ये दुखत नसणारी गाठ, जखम झालेला भाग, बरा न होणारा भाग, पॉलिगॅमी अशा धोकादायक छुप्या लक्षणांमुळे आजारांवर उपचार करण्यास विलंब होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.कर्करोगावरही घरगुती उपाय करण्याचे महिलांचे प्रयत्न असतात. गैरसमज व दुखत नसणारी गाठ धोकादायक आहे. स्तनाच्या कर्करोगाने दगावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मॅमोग्रॅफीद्वारे तपासणी किंवा वेळेतच रेडीओथेरपी व केमोथेरपी उपचार घेतल्यास आजार लवकर बरा होतो. मनका व लिव्हरपर्यंत कर्करोग पसरू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी महिलांनी वेळेत उपचार व सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.या आजाराबाबत कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचार केल्यानंतर या आजारावर मात करता येते, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. महिलांनी धावपळीच्या जीवनातही स्वत:कडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी योग्य त्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. कर्करोग होण्याच्या धोका असलेली औषधेही घेण्याचे टाळावे. वेळच्या वेळी योग्य तो आहार घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कर्करोगाची अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करून घ्यावी. वेळेतच रेडीओथेरपी व केमोथेरपी उपचार घेतल्यास आजार लवकर बरा होतो. लिव्हरपर्यंत कर्करोग पसरू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)गर्भपिशवीचा कर्करोगमहिलांमध्ये ४० ते ५० वयोगटात हा कर्करोग जास्त प्रमाणात आढळून येत आहे. रजोनिवृत्तीच्या काळात ३० टक्क्यांनी जास्त धोका महिलांना या कर्करोगाचा आहे. आजही अशा आजाराबद्दल महिला उघडपणे बोलत नाहीत. कर्करोगसदृश काही लक्षणे आढळल्यास महिला लवकर उपचार घेत नाहीत. चालढकल करतात. वेळेत उपचार होत नसल्याने आजार वाढतो. स्तनाच्या कर्करोगासाठी सतर्कता हवीस्तनाच्या कर्करोगासाठी स्तनात गाठ आहे का, हे मॅमोग्राफी व एसएलव्ही तपासणीद्वारे समजते. वेळेत उपचार व सल्ला घेतल्यास निदान लवकर समजते. अतिरक्तस्रावाने शरीरातील संप्रेरकाचे प्रमाण कमी-जास्त होते. कुटुंबात कोणाला स्तनाचा कर्करोग असेल, तर परिवारातही जीन्सच्या माध्यमातून येतो. अशा कर्करोगाचे प्रमाण सध्या पाच ते दहा टक्के आहे. स्तनाच्या कर्करोगाने दगावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी जनजागृतीची गरज आहे. उपचारांचे काही टप्पे असतात. ते वेळेत घेणे आवश्यक आहेत. कर्करोग झाल्यावर घाबरून जाण्याचे कारण नाही. वेळेत उपचार घेतल्यास कर्करोगावर मात करता येऊ शकते. - डॉ. संजय देवधर, कर्करोगतज्ज्ञ कर्करोग हा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. कर्करोग झाल्यास महिला व कुटुंबीय घाबरून जातात किंवा आजाराच्या भीतीनेच त्या खचतात. मात्र, वेळेत उपचार व औषधे सुरू केल्यास तो बरा होतो. मात्र, तो होऊच नये यासाठी महिलांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. - डॉ. संजय पाडाळे, शल्यविशारद
शहरात महिलांमध्ये वाढतोय कर्करोग
By admin | Published: March 18, 2016 3:10 AM