गावातील राजकारण हे भाऊकी आणि भाऊबंद यांच्या नात्यात गुंतलेले असते त्यामुळे एकेमेकाच्या विरोधात लढताना दोन्ही पॅनेल प्रमुखांना उमेदवार मिळविण्यासाठी धावपळ करावी लागो तीच स्थिती रांजणगाव सांडसमध्ये आहे. उमेदवाराची मनधरणी करून उमेदवार उभा केला जात आहे परंतु उमेदवाराची कागदपत्रे अपूर्ण असूनही पॅनेलमधील कार्यकर्ते कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करत असल्याची वस्तुस्थिती आहे काही ठिकाणी पॅनेल प्रमुखांना कोणी उमेदवार देता का असे म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण उमेदवाराकडे कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे व निवडणुकीचा खर्च कोणी करावा याचा प्रश्न उमेदवार पुढे असल्यामुळे उमेदवार आपल्या घरात उमेदवारी घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.त्यामुळे गाव पातळीवर तोडीस तोड उमेदवार व भाव भावकीत उमेदवार दिल्यामुळे राजकीय रंगत वाढली जाते. त्यामुळे दोन्ही पॅनेल प्रमुखांना कोणी उमेदवार देता का उमेदवार अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.
ग्रामीण भागातील गावातील बहुतांश वार्ड हे बिनविरोध होण्याची चिन्ह दिसत आहे. ग्रामपंचायत सदस्य हा नामदारी असून सरपंचच्या हातात ग्रामपंचायतीची किल्ली असल्यामुळे आणि सरपंच पदाचे आरक्षण मतमोजणीनंतर होणार असल्यामुळे सध्या सदस्य पदासाठी उभे रहावे की नको याबाबतच अनेकांच्या मनात संभ्रम आहे. मात्र ज्यांना निवडणुकीचा चांगला अनुभव आहे त्यांनी मात्र छुपा प्रचार सुरु करताना मतदार राजाला खूष करण्यासाठी पॅनेल प्रमुखांच्या माध्यमातून नवीन नवीन युक्त्या अमलात आणल्या आहेत. गावा गावातील वार्ड , सरपंच पद ,पंचायत समिती गण, जिल्हा परिषद हे सर्व आरक्षणानुसार जाहीर केली जाते परंतु महाराष्ट्रातील 288 आमदार की मतदार संघ हे आरक्षणानुसार का जाहीर केले जात नाही असे सर्वसामान्य मतदारांना पडलेले मोठे कोडे आहे.