शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Vidhan Sabha Election 2019 : पुणे जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:34 AM

Pune Vidhan Sabha Election 2019 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी त्याचा फटका विधानसभा निवडणूक प्रक्रियेला बसणार नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : पुरामुळे निवडणूक कार्यक्रमास कोणतीही बाधा नाही‘जिल्ह्यामधे ७,६६६ मतदान केंद्र असून,  २४९ सहाय्यक मतदान केंद्र जिल्ह्यात ७६ लाख ८६ हजार ६३६ मतदार असून, २४ सप्टेंबर अखेरीस ४६ हजार ५७१ नवीन अर्ज ग्रामीण भागातील मतमोजणी त्या त्या ठिकाणी घेण्याचे नियोजन

पुणे : जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असली तरी त्याचा फटका विधानसभानिवडणूक प्रक्रियेला बसणार नाही. शुक्रवारपासून (दि. २६) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.  निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मृणालिनी सावंत या वेळी उपस्थित होते. ‘जिल्ह्यामधे ७,६६६ मतदान केंद्र असून, २४९ सहाय्यक मतदान केंद्र आहेत. एकूण ७,९१५ मतदान केंद्रामधून मतदान होईल. तात्पुरत्या स्वरुपाच्या २८२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. अधिकाधिक मतदारसंघ ग्राऊंड फ्लोअरवर करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी राम म्हणाले, निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संबंधितांना खर्चाचा संपूर्ण तपशील द्यावा लागेल. जिल्ह्यात ७६ लाख ८६ हजार ६३६ मतदार असून, २४ सप्टेंबर अखेरीस ४६ हजार ५७१ नवीन अर्ज आले आहेत. त्यातील २८ हजार ९८९ नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली असून, १७ हजार ५८२ अर्जांवर अजून निर्णय झालेला नाही. तर, ३ हजार ३२६ अर्ज नाकारण्यात आले आहेत. मतदारांची अंतिम याची ४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. ........ग्रामीण भागातील मतमोजणी त्या त्या ठिकाणी घेण्याचे नियोजन आहे. शहरी भागातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी मतदारसंघाची मतमोजणी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होईल. पुणे शहरातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य गोदामामधे होईल. .......

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकNavalkishor Ramनवलकिशोर रामVotingमतदानvidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019