पेमदरा हे गाव जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील हे गाव आहे. तसेच जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. तर अहमदनगर जिल्ह्याची हद्द या गावाच्या दोन किलोमीटर पुढे गेल्यावर चालू होते. या गावाची लोकसंख्या १७५० इतकी आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून बाळासाहेब दाते यांनी तीनही वाॅर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तब्बल या तीनही वाॅर्डातून ते भरघोस मतांनी विजयी झाले. त्यांना वाॅर्ड क्र.-१ मध्ये १४८ मते, वाॅर्ड क्र.-२ मध्ये २०९ मध्ये तर वाॅर्ड क्र.-३ मध्ये २१६ मते मिळवून तीनही वाॅर्डातून भरघोस विजय संपादन केला.
बाळासाहेब दाते हे शेतकरी कुटुंबातील आहेत. या गावात एकूण ९ जागा असून दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. दाते यांचा जनसंपर्क दांडगा असून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या पत्नी अरुणा दाते यांनी गावचे सरपंचपद भूषविले आहे. यामध्ये माजी सरपंच रंगनाथ बेलकर व सुमन बेलकर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर एकूण ७ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये बाळासाहेब दाते, अनिता दाते, आशा वाव्हळ, सुवर्णा आहेर व शैला बेलकर हे उमेदवार विजयी झाले.
फोटो-बाळासाहेब दाते यांचा आहे.