लष्कर : पुणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयाचे फायर ऑडिट केले होते. त्याचा अहवाल देखील गेल्या महिन्यात ४ जून रोजी बोर्डाला दिला होता. पण, त्याकडे बोर्डाने उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आहे.
बोर्डाच्या अहवालातच अनेक चुका, त्रुटी आढळल्या होत्या. त्यावर त्वरित उपाययोजना करून त्या सुधाराव्यात असे नमूद केले होते. परंतु महिना उलटून बोर्डाने कुठल्याच बाबींची पूर्तता केली नाही. यावरून हॉस्पिटल व बोर्ड प्रशासनाची निष्क्रियता समोर आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “फायर ऑडिटमधील त्रुटी व सुचवलेल्या उपाययोजनांच्या पूर्ततेचे काम चालू आहे.”
पुणे विभागीय आयुक्तांनी फॅशन मार्केटला तसेच राज्यातील अनेक रुग्णालयात लागलेल्या आगीची दाखल घेतली होती. तसेच पुण्यातील सर्व हॉस्पिटल व इतर सरकारी व खासगी अस्थापनाचे त्वरित फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बोर्डाच्या हद्दीतील सरदार पटेल शासकीय रुग्णालयाचे ऑडिट करण्यात आले. त्यात धक्कादायक त्रुटी अग्निशमन विभागाला आढळल्या होत्या. त्या त्रुटी त्वरित प्राधान्याने पूर्ण करण्याचा शेरा अग्निशमन अधिकाऱ्याने दिला. परंतु महिना उलटूनही या त्रुटी दूर करण्यात बोर्ड चालढकल करत असल्याचे मनपाच्या ऑडिट अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
अनेक रुग्णालयांचेही ऑडिट
पटेल रुग्णालयाबरोबरच कावेडीया चेस्ट रुग्णालय नवा मोदीखाना, युनानी रुग्णालय धोबीघाट, राममंगल हार्ट केअर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट फतिमानगर आदी रुग्णालयांचे देखील फायर ऑडिट झाले आहे. या रुग्णालयाच्या ऑडिट संदर्भात देखील ताशेरे मारल्याचे कळते. बोर्डाच्या हद्दीतील इतर रुग्णालय व आस्थापनांच्या फायर ऑडिटचे काय असा प्रश्न आहे.
चौकट
‘फायर ऑडिट’ अंतर्गत सूचना
-कायमस्वरूपी फायर फायटिंग यंत्रणा बसवा-
कर्मचाऱ्यांची मॉकड्रिल इव्याक्युलशन ड्रिल वर्षातून दोनदा व्हावे
-विद्युत जोड नवीन टाकावे
-ऑक्सिजन साठा मुख्य इमारतीबाहेर हवा-
एलपीजी सिलेंडर कॅन्टीनमध्ये नको
-नोंदणीकृत संस्थेमार्फत फायर यंत्रणेची वर्षातून दोनदा तपासणी आणि फॉर्म बीची पूर्तता करा
चौकट
“फार पूर्वीपासूनच बोर्डाच्या प्रशासनाला नागरिकांच्या समस्या, आरोग्याबाबत देणेघेणे नाही. रुग्णालयाबरोबरच येथील इमारती, शाळा, आणि इतर आस्थापनांकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करते.”
-राजाभाऊ चव्हाण, जेष्ठ कार्यकर्ते