लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील अनेक गावांनी एकत्रित प्रयत्न करून आपल्या गावांना कोरोनामुक्त केले होते. तसेच कोरोनाला गावाच्या आजूबाजूलाही फिरकू दिले नव्हते. मात्र, कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने कोरोनामुक्त झालेली गावे ही पुन्हा कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहे. सध्या जिल्ह्यात ७२१ कॅन्टोमेन्ट झोन असून यात १ हजार ८०५ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाप्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात महत्त्वाची पावले उचलली होती. याला जिल्ह्यातील गावांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. गावांनी गावात बाहेरून येणारे नागरिकांसाठी विलगीकरणाची व्यवस्था केली होती. या सोबतच अनेक गावे ही स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मोठी मदत केली होती. याचाच परिणाम म्हणजे जिल्ह्यातील अनेक गावे ही काेरोना मुक्त झाली होती. तर काही गावात कोरोनाचा प्रवेशही होऊ शकला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे तसेच प्रशासनाच्या अनेक अटी शिथिल झाल्यामुळे नागरिक निष्काळजीपणामुळे वागू लागले आहे. गेल्या महिन्यात असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तसेच काही दिवसांपूर्वी निवडणुकांचे निकाल लागल्याने कोरोना नियमांची पायमल्ली करत मास्क न घातला तसेच काळजी न घेता नागरिक वावरू लागले. यामुळे दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे.
पूर्वी काही मोजके कॅन्टोमेन्ट झोन शिल्लक राहिले होते. मात्र, या झोनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारपर्यंत ग्रामीण भाग, नगरपरिषद तसेच कॅन्टोमेन्ट बोर्ड मिळूण ७२१ सक्रिय कॅन्टोमेन्ट झोन आरोग्य विभागातर्फे आखण्यात आले आहे. या झोनमधील अनेक गावात रुग्णांची संख्या वाढत आहे.
ही वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. रुग्णसंख्येनुसार त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले.
----
आरोग्य उपाययोजनांना सुरुवात
जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरूवात केली आहे. कॅन्टोमेन्ट झोन तयार करण्यासोबतच रुग्ण आढळणाऱ्या परिसरात आरोग्य व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. परिसरात आौषध फवारणी बरोबरच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध घेण्यात येत आहे.
कोट
जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून वाढणारी रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी निष्काळजीपणा न करता शासनाने दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे. ‘मी जबाबदार’ हे कर्तव्य मानून आपण आपली स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत कोरोनाला प्रतिबंध घालावा.
- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
चोकट
परिसर एकूण कॅन्टोमेन्ट झोन सक्रिय कॅन्टोमेन्ट झोन पूर्ण झालेले झोन पाॅझिटिव्ह रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू सक्रिय रुग्ण
पुणे ग्रामीण ५७६४ ४११ ५३५३ ७११०६ ६८३१९ १६३२ ११५५
नगर परिषद ६६०३ २९५ ६३०८ २०६०३ १९४९९ ५४४५६०
कॅन्टोमेन्ट बोर्ड ३७ १५ २२ ७१३९ ६८५६ १९३ ९०
एकूण १२४०४ ७२१ ११६८३ ९८८४८ ९४६७४ २३६९ १८०५