चारपैकी दोघेजण गंभीर जखमी.
कारने घेतल्या पलट्या
हरिश्चंद्री फाटा बनला अपघाताचा हॉटस्पॉट
नसरापूर : कोरेगाव येथील पिंपोडे गावाला गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्यांच्या हरिष्चंद्री येथे पुणे सातारा महामार्गावर कार चालकाचा ताबा सुटल्याने कारची पलटी होऊन भीषण अपघात घडला. संध्याकाळी ६ नंतर अपघात झाला. कारमधील चार जणांपैकी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पलट्या घेऊन झालेल्या या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. त्यात चौघेजण जखमी झाले आहेत.
अक्षय किशोर निकम (वय २४), संजोग संभाजी लोहार (वय २७), कृष्णा प्रकाश जगताप (वय २५, तिघेही राहणार कुर्ला, मुंबई) तर प्रतीक विलास गायकवाड (वय २७, रा. नेरूळ, मुंबई) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. अक्षय निकम आणि संजोग लोहार या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आशी की, अक्षय निकम हा मुंबईहून त्याच्या मित्रासह त्याच्या मूळगावी पिंपोडे ( ता. कोरेगाव) गणेश विसर्जनसाठी स्विफ्ट कार (एम.एच. ५०/११२४) मधून निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला चाक घासले. त्यामुळे कारने चार ते पाच कोलांट्या खात १०० पेक्षा अधिक फूट लांबपर्यंत कार फरफटत गेली होती.
यावेळी घटनास्थळी राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, यांच्यासह पो. हवालदार अजित माने, भगीरथ घुले, योगेश राजीवडे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन पलटी झालेल्या कारमधील सर्व जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच हरिश्चंद्री येथील ग्रामस्थ मारुती गाडे, राम पाचकाळे, शशिकांत गाडे, श्रीकांत खुटवड, प्रकाश साळवी, कापूरहोळ गावचे गणेश गाडे आदींनी सहकार्य केले. राजगड पोलिसांमध्ये घटनेची नोंद झाली.
--
सोबत क्रमांक : १८ नसरापूर अपघात
ओळ : हरिश्चंद्री येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातातील कारची अवस्था.
180921\2019-img-20210918-wa0029.jpg
सोबत फोटो व ओळ : हरीश्चंद्री येथे पुणे सातारा महामार्गावर कारच्या पलट्या होऊन भिषण अपघात झाला.