पुणे : सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडी जवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़. या अपघातात कारमधील दोघे जण एअरबॅगमुळे बचावले आहेत़ ही घटना शनिवारी सकाळी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले की, दरी पुलात कार कोसळल्याची माहिती मिळाल्यावर आमचे जवान तातडीने घटनास्थळी पोहचले. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या या कारचालकाचा वेगामुळे नियंत्रण सुटून ती कार दरीत सुमारे १०० ते १५० फुट खोल कोसळली़ कारने पलटी घेत पुन्हा चारही चाकावर ती खाली पडली़. अपघातात कारचा मागच्या भाग चेपला आहे़ कारच्या एअरबॅग उघडल्या गेल्याने पुढे बसलेले दोघे जण बचावले़. मात्र, आम्ही तेथे पोहचण्यापूर्वीच ते वर येऊन निघून गेले होते़. त्यामुळे ते जखमी झाले आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही़ ही पुण्यातील कार आहे.
सातारा -मुंबई नवीन महामार्गावरील दरी पुलावरुन कार कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 2:02 PM
सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडी जवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़
ठळक मुद्देएअरबॅग उघडल्या गेल्याने पुढे बसलेले दोघे जण बचावले़.