पिंपरी: निगडी येथील भक्ती शक्ती चौकात नाकाबंदी करत असताना पोलीस उपनिरीक्षकाला वाहनचालकाकडून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पोलीस उपनिरीक्षक उमेश नानासाहेब लोंढे (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. जयप्रकाश सन आॅफ धनंजय (वय ३२, रा. बल्हारी, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री उपनिरीक्षक लोंढे हे आपल्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर भक्ति-शक्ती चौक निगडी येथे नाकाबंदी करत होते. त्यावेळी त्यांना देहूरोड कडून येणारी मोटार वेडीवाकडी येत असल्याचे दिसून आले. त्यांनी मोटार थांबवून चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला. यामुळे संतापलेल्या चालक जयप्रकाश याने पोलिसांशी हुज्जत घालत तसेच उपनिरीक्षक लोंढे यांना धक्काबुक्की करत ढकलून दिले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी जयप्रकाश याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
निगडीत वाहन चालकाकडून पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 2:00 PM
पिंपरी: निगडी येथील भक्ती शक्ती चौकात नाकाबंदी करत असताना पोलीस उपनिरीक्षकाला वाहनचालकाकडून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पोलीस उपनिरीक्षक उमेश नानासाहेब लोंढे (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. जयप्रकाश सन आॅफ धनंजय (वय ३२, रा. बल्हारी, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ...
ठळक मुद्देयाप्रकरणी निगडी पोलिसांनी वाहनचालकाला अटक