राजगुरुनगर: सातकरस्थळ (पूर्व) (ता. खेड) येथे चारचाकी वाहनचालकांचे नियत्रंण सुटल्यामुळे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात चारचाकी पडली दरम्यान स्थानिक तरुणांच्या वेळीच कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह पती पत्नी सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, होलेवाडी (ता खेड ) गुरुदेव साम्राज्य येथे वास्तव्य असलेले प्राथमिक शिक्षक गणेश मगर आपल्या मारुती बलेनो कारमधून (क्र. एम एच १४ ..५०२७) पत्नी, त्यांचा एक आणि शेजारील दोन मुले अश्या पाचजनांसह काळेवाडी, ता. खेड परिसरात असलेल्या सौरंग्या डोंगरावरील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. परत येताना दुपारी एकच्या सुमारास सातकरस्थळ येथील चासकमान डाव्या कालव्याच्या पुलावरून वळण घेताना त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग लॉक होऊन आहे. त्या वेगात जागेवर वळण घेऊन ती थेट कालव्याच्या प्रवाहात जाऊन पाण्यावर तरंगू लागली. अशाही स्थितीत चालक असलेल्या गणेश मगर यांनी सतर्कतेने खिडकीच्या काचेतून पाण्यात उडी मारली. त्याच खिडकीला धरून गाडी ओढून कडेला नेत मदतीसाठी आरडाओरडा केला.
VIDEO: नियंत्रण सुटल्यानं कार कालव्यात पडली; तीन चिमुकल्यांसह पती-पत्नीची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 7:09 PM