गणेश खंडाळे- पुणे : लॉकडाऊन उठल्यानंतर अनेक जण ट्रेकिंगला जाण्यासाठी उत्सूक आहेत. ९० दिवस घरात बसल्यानंतर अनेकांना बाहेर पडायचे आहे. ट्रेकर्सना महा अॅडव्हेचस कौन्सिलने काही सूचना सांगितल्या आहेत. या सुचनांचे पालन केले तर कोरोना खेड्या पाड्यात पोहचणार नाही.त्याचबरोबर एकत्र येण्याने होणाऱ्या संसर्गापासून देखील ट्रेकर्स सुरक्षित राहतील.
उगाच वेगळी वाट धरू नकाभटकंतीसारखे उपक्रम बऱ्याच दिवासांपासून थांबले असल्यामुळे जंगलामध्ये, जंगला नजीकची गावे, वाड्या वस्त्यांच्या जवळ मनुष्य वावर कमी झाल्याने जंगली श्वापदे मोकळेपणाने भटकत आहेत. त्यामुळे भटकंतीला जाताना ठरलेला मार्ग सोडून उगाचच वेगळी वाट धरू नका. सतत सावधचित्त आणि गटामध्ये राहा. पायथ्याच्या गावातील लोक वन्य श्वापदांविषयी सांगत असलेली माहिती व सुचनांचे पालन करा. देवळे, शाळा ठिकाणी मुक्काम टाळा कारण बरेच दिवस बंद असल्यामुळे या ठिकाणी सपटणारे प्राणी , किटक, मधमाशांचा प्रादुर्भाव असण्याची संभावना आहे.
वैयक्तिक आरोग्य - स्वच्छते संदर्भात :थुंकीतून मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरतो म्हणून थुंकणे निषिद्ध.शौचासाठी खड्डे करावेत. वापरून झाल्यावर जंतुनाशके मिसळून मातीन भरावीत.शौचासाठी खड्डा करण्यासाठी छोटे फावेडे बाळगावे. पायवाटेवर लघवी करू नये, वाटेपासून दूर सुरक्षित अंतरावर जावे. शरीराचा कमीत कमी भाग विषाणू संसर्गाच्या संपर्कात येईल यासाठी पूर्ण अंग झाकतील असे कपडे असावेत पूर्ण बाह्यांचा शर्ट, पूर्ण लांबीची पॅन्ट, पायात बूट, डोक्यावर टोपी. रात्री झोपताना एकमेकांत ६ फूट अंतर ठेवा. किमान एकमेकांचे चेहरे जवळ येणार नाहीत यासाठी क्रॉस पद्धतीने झोपा. वारंवार थुंकवे लागते अशी व्यसने गुटका, तंबाखू, पानमसाला एकदम निषिद्ध. - डॉ. दीपा आगाशे, सहा. प्राध्यापक राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्र, बंगळुरू
सहभागीसाठी सूचना :१- लॉकडाऊनकाळात खूप दिवस घरी राहिल्यानंतर लगेच बाहेर पडण्याआधी किमान शारीरिक क्षमता प्राप्त करा. २- आयोजकांना खरी वैद्यकीय माहिती द्या. वारंवार साबणानेने किंवा सॅनिटायझरने हात धुवा. ३ - पुरेशा प्रमाणात पाणी किंवा द्रव पदार्थांचे सेवन करा. जंक फुट टाळा. एकाच प्लेटमध्ये खाणे, एकाच बाटलीत पाणी पिणे टाळा.४- स्वयंपाकाची भांडी स्वयंपाक करण्याअगोदर आणि नंतर गरम पाण्याने धुवा. दुसºयाची स्लिपिंग बँग वापरणे टाळा. आपले वैयक्तिक साधने सोबत घ्या.