दहावीनंतर जी काही क्षेत्रे उपलब्ध होतात त्यापैकी तांत्रिक शिक्षणाकडे वळणाऱ्या मुलांचे प्रमाण फारच कमी आहे. साधारण कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्सकडे मुले वळतात. यामध्ये ज्यांना अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये अधिक रस असतो अशांसाठी पारंपरिक १२वी करण्यापेक्षा डिप्लोमा आणि आयटीआय उत्तम पर्याय आहेत. मात्र माहितीचा अभाव किंवा गैरसमज अनेक आहेत. एक म्हणजे या क्षेत्रातील संधींबद्दल माहिती नसते; आणि ज्यांना अतिशय कमी गुण मिळतात त्यांनीच या क्षेत्राकडे जावे असा गैरसमज दिसतो. यासाठीच आजचा हा लेख.तांत्रिक शिक्षण (पॉलिटेक्निक) आणि व्होकेशनल शिक्षण : काळाची गरजस्कील डेव्हलपमेंटचे नारे केंद्रीय स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत वाहत आहेत. वास्तविक, आजच्या स्पर्धात्मक युगात तांत्रिक आणि व्होकेशनल म्हणजे व्यवसायाभिमुख शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. पारंपरिक शिक्षण मिळवणारी मुले प्रचंड प्रमाणात पदवीधर होऊन किंवा शिक्षण अर्धवट सोडून नोकरीकडे वळतात. या मुलांकडे विशेष प्रावीण्य असे काही नसते. त्यामुळे कितीतरी मुले केवळ हातात पदवीचे गुंडाळे घेऊन बसतात आणि मग निराश होतात. त्यांच्याप्रमाणे मार्ग चुकल्याप्रमाणे भटकण्यापेक्षा विशेष प्रावीण्याच्या क्षेत्रात उतरणे अधिक श्रेयस्कर आहे.व्होकेशनल शिक्षण म्हणजे काही विशेष स्वयंरोजगार किंवा रोजगारक्षम क्षेत्रांमध्ये शिक्षण. आपण याविषयी वेगळ्या लेखात माहिती घेऊ. सध्या आपण फक्त तांत्रिक शिक्षणाकडे लक्ष देऊ. दहावीनंतर पारंपरिक शिक्षणाची कास न धरता तुमच्या आवडीप्रमाणे तांत्रिक क्षेत्राची निवड तुम्ही करू शकता. यात कमी प्रतिष्ठेचे असे काहीच नाही. उलट बारावी किंवा पदवी करून अगदीच सामान्य नोकरी स्वीकारण्यापेक्षा हे कित्येक पटीने चांगले आहे.- हर्षद माने, लेखक करिअर मार्गदर्शक आणि प्रबोधक संस्थेचे अध्यक्ष आहेत.इंजिनीअरिंगसाठी उत्तम पर्यायकित्येकदा तर बारावी सायन्स करून प्रवेश परीक्षा देऊन आयआयटी किंवा इतर अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेण्याचा मुलांचा कल दिसतो. मात्र हा मार्ग अयोग्य आहेच, वेळखाऊ आहे आणि महत्त्वाचे म्हणजे फार आडवळणाचा आहे. यापेक्षा डिप्लोमा करून इंजिनीअरिंग करणे केव्हाही उत्तम. कारण तुम्हाला अगोदरच तांत्रिक विषयांची माहिती असते आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुमचे चक्क एक वर्ष वाचू शकते.
पॉलिटेक्निकमधील करिअरच्या वाटा
By admin | Published: June 21, 2017 3:54 AM