पुणे : कुबेर (१९४७), वंदे मातरम (१९४८), जोहार मायबाप (१९५०), माईसाहेब (१९५३) ते ‘एक होता विदूषक’ (१९९२) अशा सुमारे २६ चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनातून ‘पु.लं’ची चित्रपट कारकिर्द उलगडणार आहे. लेखक-दिग्दर्शक, अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून पुलंनी केलेल्या योगदानाला अशा चित्रपटांच्या पोस्टर्समधून उजाळा देण्यात आलेला आहे. पुलंनी लिहिलेल्या आणि अतिशय गाजलेल्या ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाच्या पटकथेची मूळ हस्तलिखित प्रत हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असेल.१ ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे निर्माते राजगुरू यांच्या कुटुंबीयांनी २०१५ साली त्यांच्या हस्तलिखिताची मूळ प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला देणगी-दाखल दिली होती. ती मूळ हस्तलिखित प्रत पुलप्रेमींना पाहायला मिळेल. याशिवाय दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात पुलंचे गाजलेले गुळाचा गणपती, पुढचं पाऊल आदी १२ चित्रपट दाखविण्यात येतील. तसेच ज्या चित्रपटांच्या प्रेरणेतून पुलंनी अंमलदार आणि तीन पैशाचा तमाशा ही गाजलेली चित्रपट लिहिले ते अनुक्रमे द इन्स्पेक्टर जनरल आणि थ्री पेनी आॅपेरा हे इंग्रजी चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत.२‘‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने ‘पुलं विषयक’ चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन तसेच त्यांच्या चित्रपटांचा खास महोत्सव आयोजित केला आहे. या पोस्टर्स प्रदर्शन आणि चित्रपट महोत्सवाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते रविवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार असून याप्रसंगी किरण शांताराम आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.३ कलेच्या प्रत्येक प्रांतात रमणाºया आणि आपल्या लेखणीद्वारे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणाºया या अद्वितीय लोकप्रिय व्यक्तिमत्वास आदरांजली म्हणून आयोजित केलेले पोस्टर्स प्रदर्शन आणि चित्रपट महोत्सव हे दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात भरविण्याचाही आमचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘पुलं विषयक’ चित्रपटांसंबंधी जे जे साहित्य अजूनही कोणाकडे उपलब्ध असल्यास ते सर्व साहित्य जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला देण्यात यावेत.
पोस्टर्समधून उलगडेल ‘पुलं’ची कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 2:07 AM