शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

करिअर निश्चित करून अभ्यास करावा

By admin | Published: July 04, 2017 4:17 AM

प्रथमत: विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे निश्चित करून, त्या दृष्टीने आवश्यक विषयांची निवड करून अभ्यास करावा,

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रथमत: विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे निश्चित करून, त्या दृष्टीने आवश्यक विषयांची निवड करून अभ्यास करावा, विविध विषयातील संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळतो, असे प्रतिपादन सप्तर्षी क्लासेसचे संचालक अमित नवले यांनी केले. लोकमत व सप्तर्षी क्लासेसतर्फे आयोजित कोथरूड येथील एमईएस आॅडिटोरियम येथे आयोजित अकरावी सायन्सला प्रवेश घेतलेल्या-घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेत अमित नवले बोलत होते. नवले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अकरावी अभ्यासक्रम व जेईई, नीट यांसारख्या प्रवेशपूर्व परीक्षांचा ताण न घेता योग्य नियोजन करून अभ्यास केला पाहिजे, काही कोचिंग क्लासेसकडून जेईई, नीट, सीईटी या पूर्वपरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे, मात्र विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. करिअर तज्ज्ञ प्रा. विजय नवले यांनीही या वेळी सायन्समधील करिअरच्या संधीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. प्रा. विजय नवले म्हणाले की, करिअर ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, आवड, क्षमता आणि पात्रता ही करिअर निवडीची त्रिसूत्री आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता आणि पात्रता लक्षात घेऊन ध्येयाकडे वाटचाल करावी, फक्त प्रवेश घेणे म्हणजे करिअर नाही, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. या वेळी त्यांनी करिअर निवडीसंदर्भातील काही किस्से आणि उदाहरणे सांगितली. शेवटी विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांना अमित नवले व प्रा. विजय नवले यांनी उत्तरे दिल्याने विद्यार्थी व पालकांच्या मनातील शंका दूर झाल्या. सप्तर्षी क्लासेसच्या संचालिका शिल्पा नवले यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मार्गदर्शन कार्यशाळेचे सूत्रसंचालन मयूर टण्णू यांनी केले. नियोजनबद्ध अभ्यास व योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीच्या परीक्षांसह प्रवेशपूर्व परीक्षामध्येही चांगले गुण मिळवता येतात. प्रथमत: आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे निश्चित करूनच ध्येयाकडे वाटचाल करावी, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर ताणही येत नाही.- अमित नवले, संचालक, सप्तर्षी क्लासेस सर्वच क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, परंतु संधी ही कार्यक्षेत्रावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या कार्यक्षेत्रातील कर्तृत्वावर अवलंबून आहे. मी कोण होणार, यापेक्षा मी काय करणार, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. - प्रा. विजय नवले, करिअर मार्गदर्शक