विवेक भुसेपुणे : आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंग केल्याबद्दल दंड केला आहे का, ते तपासून पहा असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर जाऊन वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यात फेक वेबसाईटवर ते जातात. त्यातून त्यांची फसवणूक होत असून सायबर पोलिसांकडे आतापर्यंत गेल्या २ दिवसात ५ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.हेल्मेटसक्तीला पुण्यात विरोध झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीसीटीव्हीद्वारे हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सध्या शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे कारवाई करुन त्यांना कारवाई केल्याचा मेसेज मोबाईलवर पाठविला जातो. त्याचबरोबर आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंगाचा दंड न नाही ना हे तपासावून पाहण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर आरटीओ पुणे असा सर्च मारतात. त्यावेळी काही जणांवर नकळत फेक वेबसाईटवर जातात. त्यातून त्यांना तुमच्या वाहनावर मोठा दंड असल्याचे सांगून तो भरायला सांगतात. त्यांनी तो भरल्यानंतर आरटीओकडून दंड भरल्याची पावती येते. ती या वेबसाईटवरुन येत नाही. लोकांनी संबंधित फोनवर नंतर संपर्क साधल्यावर तो बंद आढळून येतो.आतापर्यंत दोन दिवसात ५ तक्रारी प्रत्यक्षात आल्या असल्या तरी अजून काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस या गुन्ह्यांचा तपास सुरु केला आहे. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.काय काळजी घ्याल?* आरटी ओ पुणे च्या वेबसाईटवर ०२०- २६०५८२८२/ ०२० - २६०५८०८०/ ०२०- २६०५८५५५ हे फोन नंबर असतील तरच पुढे संपर्क करा. ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे.* ज्या वेबसाईटवर ९१ ने सुरु होणारे नंबर असतील, त्या वेबसाईटवर संपर्क साधू नका.* हे फोन परराज्यातील आहेत. त्यामुळे त्यावरुन फसवणूक होऊ शकते. आतापर्यंत हा क्रमांक असलेल्या वेबसाईटवर संपर्क करणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. आरटीओ पुणे च्या नावाने ऑनलाईन दंड भरल्यानंतर तो फेक अकाऊंटला जमा झाला असल्याने वाहनचालकांची फसवणूक झाल्याच्या ५ तक्रारी गेल्या दोन दिवसात आल्या आहेत. तेव्हा लोकांना आरटीओ पुणेच्या अधिकृृत वेबसाईटला भेट देऊन अगोदर खात्री करावी.- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस, पुणे
सावधान ! पुणे आरटीओच्या फेक बेवसाईटवरुन होतेय फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 8:05 AM