शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

वाहकाने विद्यार्थिनींना लावले पाय धरायला, पालक झाले संतप्त

By admin | Published: October 19, 2015 8:13 PM

चुकीच्या मार्गावरील बसमध्ये चढलेल्या विद्यार्थिनींना पीएमपीच्या वाहकाने चक्क पाया धरून माफी मागण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १९ - चुकीच्या मार्गावरील बसमध्ये चढलेल्या विद्यार्थिनींना पीएमपीच्या वाहकाने चक्क पाया धरून माफी मागण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे. कात्रज-पद्मावती भागात राहणाऱ्या सहा ते सात विद्यार्थिनी पुलगेट येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येतात. त्यातील काही सातवीच्या, तर काही आठवीत शिकत आहेत. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या घरी जाण्यासाठी त्या पीएमपी बस थांब्यावर आल्या. गोळीबार मैदान येथील थांब्यावरून त्या कोथरूडला जाणाऱ्या पीएमपीमध्ये चढल्या. वाहकाने त्यांना पास मागितला. तेव्हा त्यांना चुकीच्या बसमध्ये बसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बस थांबविण्याची विनंती केली. मात्र, पास चालत नसल्याने तिकीटच काढावे लागेल, नाहीतर कोथरूड येथे घेऊन जाईन... असे वाहकाने दरडावून सांगितले व बस थांबविली नाही. तिकिटासाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थिंनी चांगल्याच भेदरल्या होत्या. अखेर तिघीजणी स्वारगेट येथील बसथांब्यावर उतरल्या, तर बाकीच्यांना नेहरू स्टेडियमच्या बस थांब्यावर वाहकाने उतरवले; परंतु उतरण्यापूर्वी त्याने या विद्यार्थिनींना पाय पडून माफी मागण्यास भाग पाडले. स्वारगेटहून पुढच्या बसथांब्यावर नेऊन सोडल्यामुळे या विद्यार्थिनी अधिकच घाबरल्या. 

विद्यार्थिनींकडून ही घटना समजल्यानंतर पालक व संतप्त नागरिकांनी कोथरूड डेपोत डेपो सुपरवायझर रज्जाक शिकलकर यांना घेराव घातला. शिकलकर यांनी या विद्यार्थिनींकडून घटनेची माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या वर्णनावरून वाहक व चालकांची माहिती मागविली. संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले. बसचा क्रमांक किंवा मार्ग क्रमांक दिल्यास दोषी वाहकाला शोधून काढून त्याच्यावर कारवाई करता येईल, अशी माहिती पीएमपीचे कोथरूड आगारातील अधिकारी चंद्रकात वर्पे यांनी दिली.