शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खाजगी कंपनीतील ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 2:55 PM

पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या ...

पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह ५ जणांविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष व्यंकट कामनबोयना (वय १९, रा. बालाजीनगर, घोरपडी गाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ऐश्वर्या जोशी, महिंद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुजाता व्यंकट कामनबोयना (३६) यांनी फिर्याद दिली आहे. आशिषने २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बालाजीनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा यश ज्योती डेबीट कन्सल्टसी कंपनीमध्ये काम करत होता. थकलेले हप्ते वसुल करण्याचे काम ही कंपनी करते. आशिष याने ग्राहकाकडून हप्ते वसुल करताना ते कंपनीच्या खात्यावर जमा करायला सांगण्याऐवजी आपल्या मित्राच्या खात्यावर ३० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले व ते पैसे खर्च केले. कंपनीचे पैसे परस्पर दुसऱ्या खात्यावर वळविल्याचे मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांना समजले. त्यानंतर आशिष यांची आई फिर्यादी यांनी कंपनीमध्ये जाऊन हे पैसे भरले.

तरीही ऐश्वर्या जोशी, महिद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांनी आशिष यास दररोज कंपनीमध्ये बोलावुन अजून रक्कम घेतल्याची भीती घालून त्याचा मानसिक छळ केला. त्यामुळे त्याने गुरुवारी दुपारी घरी आत्महत्या केली. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोटे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी