शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Pune: अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकावणाऱ्या पीएसआयवर गुन्हा दाखल; खात्यातून निलंबित

By विवेक भुसे | Published: April 08, 2023 3:20 PM

कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली होती...

पुणे : आपल्या अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करुन कमरेच्या पिस्तुलाला हात लावून जीवे ठार मारण्याची धमकी एका पोलीस उपनिरीक्षकाने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी प्रविण नागेश जर्दे या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रविण जर्दे हा सध्या कोर्ट आवार येथे नियुक्तीला आहे. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली होती.

याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. तिने हे संबंध सोडून द्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होता. तिने हे प्रविण जर्दे याला सांगितले. त्यावरुन प्रविण जर्दे हा त्यांच्या घरात शिरला. त्याने फिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे. तसेच त्याने कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी व त्यांच्या घरचे घाबरुन गेले होते. शेवटी त्यांनी हिंमत करुन पोलिसांकडे गेले. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दोन पोलीस उपनिरीक्षक निलंबितगुन्हा दाखल झाल्याने त्याची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस खात्यातून निलंबित केले आहे. तसेच गाडी मिळवून देण्याचा मोबदला म्हणून २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाच लुचपत पतिबंधक विभागाने ५ एप्रिल रोजी पवार याला अटक केली. न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी शशिकांत पवार याला निलंबित केले आहे.

टॅग्स :kothrud policeकोथरूड पोलीसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी