एकनाथ सोनवणे (वय 32) याच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल सात महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तेथीलच सरपंच भीमराव गोविंद काळे यांच्या विरोधात सचिन याची पत्नी सोनाली सोनवणे यांनी दिलेल्या
फिर्यादीनुसार इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याची हकिगत अशी की, सरपंच काळे यांनी
दि.07/03/2019 रोजी सार्वजनिक ठिकाणी मयत सचिन यास सरपंच काळे हे सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक बोलल्याने त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा
गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काळे यांनी वेळोवेळी सचिन यास
मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच तत्कालीन ग्रामसेवकामार्फत खोटा
गुन्हा दाखल करून सचिन यास अटक केली. तसेच वेळोवेळी त्यास गुंडांकडून मारहाण करण्यात आली होती. या सर्व त्रासास कंटाळून दि.27/07/2020 रोजी
सचिन याने घरासमोरील पोर्चमध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन
आत्महत्या केली होती. याबाबत अद्यापपर्यंत कारवाई झालेली नव्हती.
यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा संघटक
शिवाजी मखरे व त्यांचे सहकार्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन याप्रकरणी
लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर मंत्री आठवले यांनी पुणे जिल्हा
ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई
करावी, अशा आशयाचे पत्र दिले होते. तसेच याप्रकरणी कारवाई न झाल्यास मखरे
यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.