शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

रेणुका देवी दूध संस्था निवडणूक हल्ला प्रकरण; प्रसिद्ध उद्योगपती विकास ताकवणेसह ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 8:02 PM

ताकवणे हे सिद्धेश्वर इंडस्ट्रीज पिंपरी-चिंचवडचे प्रमुख असून पिंपरी-चिंचवड मध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आहे...

केडगाव (पुणे): पारगाव ( तालुका- दौंड ) येथील विकास ताकवणे (vikas takavane) यांच्या वरती गुंडांच्या साह्याने ताकवणे बंधूंना तीक्ष्ण हत्याराने इजा करण्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. ताकवणे हे सिद्धेश्वर इंडस्ट्रीज पिंपरी-चिंचवडचे प्रमुख असून पिंपरी-चिंचवड मध्ये उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आहे. त्यांच्या पत्नी नंदा विकास ताकवणे या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका आहेत. ताकवणे यांनी २०१४ मध्ये दौंड विधानसभा निवडणूक लढवली आहे.

सदर घटना शनिवार दिनांक १५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. गुन्हा केल्याबद्दल विकास बापूराव ताकवणे यांच्यासह अज्ञात पाच गुन्हेगारावर यवत पोलीस स्टेशन मध्ये वरील गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुन्हा बाबत ताकवणे व इतर पाच आरोपींना एकूण १२ कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये कलम क्रमांक ३२३,३२४,१४३,१४७,१४८,१४९ ,३४१, ५०४,५०६ शस्र अधिनियम४,२५ फौजदारी कायदा अधिनियम ७ अधिक कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

रेणुका देवी दूध संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संस्थापक अध्यक्ष पोपटराव ताकवणे आपले मतदार संस्थेच्या कार्यालयमध्ये घेऊन येत असताना प्रवेशद्वाराजवळ अज्ञात पाच जणांनी एका फॉर्च्युनर (एम एच १२ के.आर.९२९२)गाडीतुन खाली उतरुन फिर्यादी रामकृष्ण ताकवणे यांना विकास बापूराव ताकवणे यांच्या सांगण्यावरून आम्ही आलो असून सदर संचालकांना आम्ही मतदानासाठी आज जाऊ देणार नाही अशी दमदाटी केली.

स्थानिकांनी विरोध केला असता रामकृष्ण ताकवणे यांच्यावर गुंडांनी कोयत्याने हल्ला केला. रामकृष्ण ताकवणे यांना वाचवताना तुकाराम ताकवणे यांना हाताला जखम झाली. चुलत भाऊ सचिन ताकवणे यांच्या डोळ्याखाली हल्ल्यामध्ये जखम झाली. अज्ञात इसमापैकी एकाने कोयता घटनास्थळी ठेवून सर्वांनी फॉर्च्युनर गाडीमध्ये पलायन केले. यावरून रामकृष्ण ताकवणे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

फॉर्च्यूनर गाडीबाबत धक्कादायक माहिती-या हल्ल्यामध्ये गुंडांनी आणलेली फॉर्च्युनर गाडी पुणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद सदस्यच्या नावावरती आहे. त्यांनी एका इसमला गेली दीड वर्षापासून गाडी विकण्यासाठी दिली आहे. तीच फॉर्च्युनर गाडी या हल्ल्यामध्ये वापरण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdaund-acदौंडElectionनिवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड