शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

नेत्यांसाठी पासधारकांची गळचेपी

By admin | Published: May 05, 2015 3:09 AM

तरण तलावात पोहण्याची ऐन उन्हाळ्याच्या हंगामात महिलांसाठी सकाळची बॅच राखीव केली आहे. त्यास अल्प प्रतिसाद मिळत असूनही काही राजकीय नेत्यांच्या

मिलिंद कांबळे, पिंपरीतरण तलावात पोहण्याची ऐन उन्हाळ्याच्या हंगामात महिलांसाठी सकाळची बॅच राखीव केली आहे. त्यास अल्प प्रतिसाद मिळत असूनही काही राजकीय नेत्यांच्या आग्रहामुळे ऐन हंगामात या बॅच सुरू ठेवल्या आहेत. यामुळे पासधारकांची मोठी गैरसोय होत असून, महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटत आहे. गेल्या महिन्याच्या ११ तारखेपासून सकाळी ६ ते ६.४५ ही बॅच केवळ महिलांसाठी राखीव करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला. पूर्वी दुपारी २ ते २.४५ ही एक बॅच महिलांची होती. सध्या दिवसभरात २ बॅच महिलांसाठी आहेत. सध्या नेहरुनगर आणि सांगवीचा तलाव दुरुस्तीसाठी बंद आहे. उर्वरित ८ तलावांमध्ये सकाळच्या बॅचला महिलांचा अल्प प्रतिसाद आहे. काही तलावावर ५ ते १० इतक्याच महिला पोहण्यास हजेरी लावतात. त्यामुळे महिनाभराच्या आतच कमी प्रतिसाद असलेल्या तलावावर ही स्वतंत्र बॅच बंद करण्यात आली. केवळ तीनच तलावावर सकाळची बॅच सुरू होती. बॅच बंद केल्याने पुन्हा काही राजकीय नेत्यांनी पालिकेला त्या सुरू करण्यास भाग पाडले. अल्प प्रतिसादात सध्या सर्व ८ तलावांवरील सकाळच्या महिलांच्या बॅच सुरू आहेत. शहरात एकूण तीन ते साडेतीन हजार पासधारक आहेत. उन्हाळ्यातील हंगामात पासधारकांची संख्या अधिक वाढते. सकाळची बॅच महिलांसाठी राखीव केल्याने पासधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुपारची बॅच महिलांसाठी आहे. सकाळच्या बॅचला प्रतिसाद नाही. त्यामुळे सकाळची बॅच त्यांच्यासाठी राखीव करण्याची गरज नसल्याचे त्याचे मत आहे. ही तक्रार कायम आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटत आहे. दरम्यान, सकाळच्या वेळेत महिलांना घरात भरपूर कामे असतात. त्यामुळे त्यांना या वेळेत पोहण्यास जाता येत नाही. दुपारनंतर रिकाम्या वेळेत हा प्रतिसाद वाढू शकतो. महिला बॅचमध्ये लहान मुलांना प्रवेश दिल्यास इतर बॅचवर होणारा परिणाम काहीसा कमी होईल. १० वर्षांखालील मुलांना महिलांसोबत प्रवेश देण्यास काहीच हरकत नाही. त्यानंतरच्या बॅचला येणाऱ्या मुलांची संख्या त्यामुळे कमी होईल आणि महिला बॅचला प्रतिसाद वाढेल, असा एक मतप्रवाह आहे. शिबिरासाठी आरक्षण नसावे उन्हाळा व दिवाळी सुटीत काही संस्था आणि स्पोटर््स क्लब शिबिराच्या नावाखाली बॅचचे आरक्षण करतात. एका बॅचला ४०० रुपये भाडे भरले जाते. साधारण २० ते २५ दिवसांचे शिबिर असते. त्यासाठी ते प्रत्येकाकडून एक हजार ते दीड हजारांचे शुल्क आकारतात. मात्र, ऐन हंगामात या शिबिरासाठी २ ते ३ बॅच राखीव केल्या जातात. त्यामुळे पोहण्यास येणाऱ्यांची मोठी गैरसोय होते. हंगाम काळात शिबिराला आरक्षण देण्याची पद्धत बंद केल्यास पोहणाऱ्यांची संख्या वाढेल.