पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडाकरी यांनी जातीपातीच्या राजकारणकवरून एक मिश्किल टिपण्णी केली आहे. निवडणुकीच्या काळात जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यावर आपल्या बायकोला, मुलीला आपल्या चमच्याला, आपल्या ड्राइवरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं असं म्हणत त्यांनी राजकारणी लोकांना एका प्रकारे सल्ला दिला आहे. या स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल मी हे बोलत नाही हा बर? असं ते मिश्कीलपणे टोला लगावला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचे भूमिपूजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. पण कधी राजकरण केले नाही. मी फक्त समाजकार्य करत असतो. मी लोकसभेत उभा होतो. सगळ्या जातीपंथाची लोक त्यावेळी आली होती. तेव्हा मी सांगितलं कि माणूस जातीने नव्हे तर त्याच्या गुणांनी मोठा होत असतो. आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं आहे. समाजातील जातीयता उच्च निच्चतेचा भाव समूळ नष्ट झाला पाहिजे. आणि सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही. महाराज मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ. कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे. निवडणुकीच्या काळात जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यावर आपल्या बायकोला, मुलीला आपल्या चमच्याला, आपल्या ड्राइव्हरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं. या स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल मी हे बोलत नाही हा बर? आणि म्हणून जातीयता उच्च निच्चतेच भाव आपल्याला नष्ट करायचा आहे. हाच मानवतेचा धर्म तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलं आहे.
पसायदान डिजिटल करणार
महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे, गजानन महाराज, गाडगे महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अभांगानी आपल्या सगळ्यांच जीवन संपन्न केलय. मी शाळेत शिकताना शिक्षकांनी पसायदान शिकवलं. पसायदानाचा अर्थ एवढा मोठा आहे कि महाराष्ट्राच्या सारस्वताच खूप मोठे वैभव आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून सेवेचा मार्ग दाखवला आहे. माझी इच्छा आहे तुकाराम महाराज गाथा ज्ञानेश्वरी असं मी डिजिटल तयार करणार आहे. त्या डिजिटल मध्ये पेन जो असतो त्या पसायदानावर ठेवला कि ते सुरु होईल. तसेच तिन्ही इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेत ऐकायला मिळेल. दिल्लीत एका कंपनीच्या मालकाशी बोललो आहे. त्याच कामही सुरु झालं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.