बीबी हे गाव चासकमान धरणात लुप्त झाले आहे तर गुंडाळवाडी, बुरसेवाडी, ठाकरवस्ती यामधे गावाचे विभाजन झाले आहे. या वाड्या भीमाशंकर रोडवर वाडा परिसरात असल्याने नागरिकांची वर्दळ असते. कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावकरी कंबर कसून, स्वतः वेळ देऊन, श्रमदान करताना दिसतात. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतमार्फत सॅनिटायझर्स फवारणी करण्यात आली.
याकामी सरपंच सुजाता भोर, उपसरपंच सतीश जैद, उद्योजक सागर भोर, संतोष डोंगरे, शशिकांत जैद, चंद्रकांत डोंगरे यांनी स्वतः पाठीवर पंप घेऊन फवारणी केली. सदर काम मार्गी लावण्यासाठी सदस्य अरुण अण्णा गुंडाळ, दीपक कालेकर, रवी बुरसे, फसाबाई चतुर, सोनबाई दोरे, संगीता तनपुरे, मंगल बुरसे व ग्रामसेवक कल्याणी राजगुरू यांनी मदत केली.
आपल्या गावातील नागरिकांचे कोविडपासून संरक्षण करण्यासाठी तरुण उपाययोजना करत आहेत. गावातील जमावबंदी, मास्कचा वापर, सॅनिटायझर फवारणी, सामाजिक अंतर राखणे यासाठी ग्रामपंचायत कार्यरत आहे.