शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्री

By admin | Published: February 05, 2016 2:14 AM

नगरपालिका हद्दीतील वसुलीसाठी मिळकतधारकांच्या घर आणि गाळ्यांसमोर वाजंत्री लावली जात आहेत. याशिवाय पोस्टकार्ड, एसएमएस आदींद्वारेही नागरिकांना कर

बारामती : नगरपालिका हद्दीतील वसुलीसाठी मिळकतधारकांच्या घर आणि गाळ्यांसमोर वाजंत्री लावली जात आहेत. याशिवाय पोस्टकार्ड, एसएमएस आदींद्वारेही नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या करापोटी १४ कोटी रुपये येणे आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. मालमत्ताकर विभागाने मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीसाठी कंबर कसली आहे. शिक्षणकर, रोजगार हमी कर, मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपालिकेने हा नवीन फंडा वापरला आहे. वाजंत्र्यांचे पथक थकबाकीदाराकडे जात आहे. घर-गाळ्यांसमोर वाजंत्री दणदणाट करीत आहेत. यामुळे परिसरात चर्चेचा विषय होत आहे. त्यामुळे थकबाकीदाराला तोंड लपविणे अशक्य होत आहे. या थकबाकीदारांचे मोबाईल क्रमांक, नावे नगरपालिकेकडे आहेत, त्या माध्यमातूनही एसएमएस पाठवून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पोस्टकार्ड थकबाकीदारांना पोस्टकार्ड पाठवून थकीत व चालू कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. जे नागरिक कर भरणा करीत आहेत, त्यांना आभाराचेही पोस्टकार्ड नगरपालिकेकडून पाठवण्यात येत आहे. नगरपालिकेचा १ कोटी ८ लाखाचा शिक्षणकर थकीत आहे, तर चालू मागणी १ कोटी ७० लाखांची आहे. रोजगार हमीकर सुमारे १२ लाखांचा थकीत आहे. .