मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सोमनाथ विठ्ठल गवारी यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने पुणे-नाशिक महामार्गावर जीवन खिंड येथे सापळा रचला. टेम्पो (एम. एच. १२, एफ. झेड. ४७३५) हा महामार्गावर येताना दिसला. पोलिसांनी हे वाहन अडवले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चालक पळून गेला. सदर टेम्पोमध्ये बेकायदेशीररित्या उत्खनन करून चोरी करून वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.या टेम्पोतील चार ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी सोमनाथ गवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाळूचोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेटे करत आहेत.
अवैध वाळू वाहतूक पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:14 AM