एक महिला व पुरुष असे दोघे जण घरात चोरी करत होते. त्यांना मी पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात समोरील व्यक्तीने माझ्यावर पिस्तूल रोखले. त्याने माझ्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. तरी मी धाडस करत त्याला पकडले. त्याची मान मी माझ्या काखेत दाबली होती. मान सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने माझ्या हाताचा जोरात चावा घेतला. दहा मिनिटे आमच्या हा थरार सुरू होता. मी त्याला ढकलत खालच्या जिन्यापर्यंत आणले. त्यानंतर इतर नागरिकांच्या मदतीने त्याला आम्ही पकडून पोलिसांच्या हवाली केले. दुसऱ्या मजल्यावर आम्ही सर्वजण होतो. त्याला तेथेच मी थांबविण्याचा प्रयत्न केला नसता तर त्याने घरातील इतर लोकांना देखील मारण्याचा प्रयत्न केला असता, त्यामुळे मी माझ्या जीवाची पर्वा न करता चोरट्याचा प्रतिकार केला, असे आवेज अन्सारी यांनी सांगितले.
------------------
भोळेला जन्मठेपेची शिक्षा
भोळे हा नाशिक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, घरफोडी असे गुन्हे आहेत. कोविडमुळे तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आला आहे. तो दिवसाच घरफोडी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
......
खडकमाळ आळी परिसरातील हीना टॉवर इमारतीत चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. त्यावेळी तेथे गेलेल्या तरुणाने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्याने गोळीबार केला. तसेच त्याच्या हाताचा चावा घेत जखमी केले. आरोपीविरुद्ध घरफोडीचे गुन्हे असून त्याच्याकडून पिस्तूल व काडतूस ताब्यात घेतले आहे.
- श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे