खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की वाफगाव रोडलगत लगत एका चिंचेच्या झाडांच्या खाली जुगार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, हवालदार सचिन जतकर, शेखर भोईर, स्वप्निल गाढवे, निखिल गिरीगोसावी विशाल कोठावळे यांनी (दि.१२)दुपारी छापा टाकला. यामध्ये प्रकाश पोपट गार्डी (वय ४६), रजाकभाई अहमद इनामदार (वय६७ ), महादू ज्ञानेश्वर जाधव ( वय ३२ ), सुनील बारकू गार्डी (वय ४८), शिवाजी बाळू रणपिसे (वय ४०), सुनील कृष्णराव सुर्वे (वय ६३), बाबाजी पोपट टाकळकर (वय २६) सर्व रा. वाफगाव, चिंचबाईवाडी (ता खेड ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे सर्वजण बेकायदा, बिगर परवाना तीनपत्ती नावाचा जुगार पैसे वापरून खेळत असताना तसेच कोरोना काळात पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडून १० हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार खेळताना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:10 AM