सलीम अब्दुल कपडे (वय ४१, रा. रूम नंबर ६, कपाशी इमारत नालासोपारा डांगे टाॅवरच्या मागे, ठाणे), निसार अहमद मिरउस्मान शेख ( वय ४०, रा. मिरारोड शममज्जीदशेजारी, साना मेडिकलजवळ, मुंबई), कादर मुसा शेख (रा. अहमदनगर), मोबीन व कादर (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की आळेफाटा येथे नगर-कल्याण महामार्गावरून नगरहून कल्याणकडे जाणाऱ्या टेम्पो (एमएच ०४ के एफ ०८८२) मधून जनावरांच्या मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना मिळाल्यानंतर हा टेम्पो आळेफाटा येथील पेट्रोल पंपासमोर पकडण्यात आला त्यामध्ये भाजीपाल्याच्या खाली सुमारे तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे जनावरांचे मांस आढळून आले. सलीम अब्दुल कपडे, निसार अहमद मिरउस्मान शेख, कादर मुसा शेख, मोबीन व कादर या पाच जणांच्या विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पाचजणांपैकी सलीम अब्दुल कपडे व निसार शेख या दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए. टी. गायकवाड करत आहेत.
--
फोटो क्रमांकन - २५ आळेफाटा
- जनावरांचे गोमांस घेऊन जाणारा टेम्पो आळेफाटा पोलिसांनी पकडला.