शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुरूम टाकल्याच्या कारणावरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:56 AM

कापडदरा येथील घटना; पाच जणांवर गुन्हा दाखल

मंचर : कापडदरा येथील दोन गुंठे जागेत विहिरीचे डबर व मुरूम टाकल्याच्या कारणावरून रामदास जगन्नाथ वैद (वय ४०, रा. वैदवाडी) यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारुन खून करण्यात आला आहे. त्यांची पत्नी विमल रामदास वैद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राम तात्याबा वाळुंज, रा. पोंदेवाडी, पोपट भिका कापडी, म्हतारबा नानाभाऊ कापडी (दोघेही रा. जारकरवाडी), शिवाजी गेणभाउ दौंड, खंडू दत्तात्रय वारे, (रा. पोंदेवाडी) व संतोष लक्ष्मण वैद, (रा. वैदवाडी) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.मंचर पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन २६ जूनला काठापूर हद्दीतील वैदवाडी ते पोंदेवाडी या रस्त्यालगत असणाऱ्या गटारात रामदास जगन्नाथ वैद यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या डोक्याला मारहाण झाली होती. वैद यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.कुटुंबियांना या मृत्युबाबतचा संशय होता. गावातील कैलास ज्ञानेश्वर पोंदे याने संतोष वैद याने रामदास वैद व पांडूरंग करंडे यांना काठापूर येथील निमंत्रण ढाब्याजवळ नेले होते. कैलास याने दिलेल्या माहितीवरुन संतोष याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी ढाब्यावर गेल्यावर राम तात्याबा वाळुंज, पोपट भिका कापडी, म्हतारबा नानाभाउ कापडी, शिवाजी दौंड, पांडूरंग बाळासाहेब करंडे, संतोष लक्ष्मण वैद आणि खंडू दत्तात्रय वारे येथे आले. राम वाळुंज याने संतोष वैद यांना मारहाण केली. तसेच तू येथून निघुन जा, तुला कोणी विचारले तर रामदास वैद यास घाटात सोडले असे सांग असे संतोषला सांगण्यात आले. हा सर्व घटनाक्रम पाहिल्यावर रामदास वैद याचा खून झाल्याची खात्री वैद कुटुंबियांना झाली. कापडदरा येथील विहिरीच्या दोन गुंठे जागेत विहीरीचे डबर व मुरुम टाकल्याच्या कारणावरुन पती रामदास वैद यांच्या डोक्यात कशानेतरी मारहाण करुन त्यांचा खून झाल्याची फिर्याद विमल रामदास वैद यांनी मंचर पोलीसांत दिली. पोलीसांनी राम तात्याबा वाळुंज, पोपट भिका कापडी, म्हतारबा नानाभाउ कापडी, शिवाजी गेणभाउ दौंड, पांडूरंग बाळासाहेब करंडे, खंडू दत्तात्रय वारे व संतोष लक्ष्मण वैद यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे