पुणे : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पुन्हा एकदा प्लॅस्टिक वापरावर जोरदार कारवाई सुरु केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. ४) कारवाई सुरु केली असून, यामध्ये गारबेज बॅग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. २८० किलो गारबेज बॅग्ज जप्त करण्यात आल्या, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.राज्य शासनाच्या निर्णयानंतर शहरात महापालिकेच्या वतीने प्लॅस्टिक वापरावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई थंड पडली आहे. यामुळे सध्या शहरामध्ये सरास प्लॅस्टिकविक्री सुरु असून, हे प्रमाण पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मात्र महापालिकेच्या वतीने पुन्हा कडक कारवाई सुरु केली असून, यासाठी स्वतंत्र दोन पथक स्थापन करण्यात आले. यामध्ये प्लॅस्टिक विक्री करणारे, व्यावसायिक आणि ग्राहक सर्वांवरच कारवाई करण्यात येणार आहे.महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरातील सर्व मुख्य चौक, सिग्नल येथे गारबेज बॅग्ज विकणाºया लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन (झेड ब्रीजखाली आणि काँग्रेस भवनसमोरील फुटपाथ) साधारण २८० किलो गारबेज बॅग्ज जप्त करण्यात आल्या.पुणे महानगरपालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी पथकाचे आरोग्य निरीक्षक शाहू पोकळे, राजेश रासकर, उमेश देवकर आणि अमोल पवार या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. शहरात प्लॅस्टिक वापरावर कारवाईची तीव्रता वाढविणेत आली आहे. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून जर नागरिकांकडे अशा बॅग व प्लॅस्टिक पिशव्या आढळल्यास कारवाई केली जाईल, असे माधव जगताप यांनी सांगितले.
सावधान... प्लॅस्टिक वापरावर पुन्हा कारवाई सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 1:55 AM