पुणे : भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) नाव आणि लोगो वापरून पदभरतीच्या बोगस जाहिराती पसरविल्या जात आहे. यामाध्यमातून काही जण नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन ‘एएआय’ने केले आहे.विमानतळ प्राधिकरणाकडून विविध पदांसाठी भरती प्रकिया राबविली जात आहे. त्यासाठी संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मात्र, या जाहिरातींचा आधार घेत काही जणांकडून बोगस जाहिराती आणि नोकरीच्या आॅफर्स दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या जाहिरातींवर ‘एएआय’चे नाव व लोगोही देण्यात आलेला आहे. काही संकेतस्थळांवर ‘एएआय’च्या रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे. बनावट जाहिरात करणाऱ्यांकडून इच्छुकांना नोकरीच्या आॅफर्ससाठी पैशांचीही मागणी केली जात आहे. यावर ‘एएआय’चे महाव्यवस्थापक (एचआर) के. श्रीनिवास राव यांनी इच्छुकांनी संबंधित जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.‘एएआय’ने कोणत्याही संकेतस्थळाला नोकरभरतीसाठीचे अर्ज स्वीकारणे किंवा रिक्त जागांंची माहिती प्रसिध्द करण्यासाठी अधिकृत मान्यता दिलेली नाही. ही सर्व माहिती ‘एएआय’चे अधिकृत संकेतस्थळ, रोजगारविषयक वृत्तपत्रांमध्ये माहिती देण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्यासाठीची लिंकही केवळ या संकेतस्थळावरच आहे. तसेच केवळ आॅनलाईन नोंदणी करतेवेळी एकदाच आॅनलाईन शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राव यांनी प्रसिध्द दिलेल्या पत्रकातून केले आहे.----------
भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 8:58 PM
‘एएआय’ने कोणत्याही संकेतस्थळाला नोकरभरतीसाठीचे अर्ज स्वीकारणे किंवा रिक्त जागांंची माहिती प्रसिध्द करण्यासाठी अधिकृत मान्यता दिलेली नाही.
ठळक मुद्देविमानतळ प्राधिकरणाचे आवाहन : विविध संकेतस्थळांवरून नोकरीचे अमिषजाहिरातींचा आधार घेत काही जणांकडून बोगस जाहिराती आणि नोकरीच्या आॅफर्स